प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

केंद्र सरकारच्या नव्या भूमी कायद्याला विरोध करीत पीडीपीने गुरुवारी काश्मीरमध्ये आंदोलन केले. पोलिसांनी या आंदोलनावर कारवाई करीत पीडीपी नेते खुर्शीद आलम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना अटक केली. दरम्यान, जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी पीडीपीचे कार्यालय सील केले आहे, अशी माहिती जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांनी टि्वट करून दिली. महबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकावरही टीका केली आहे. श्रीनगरमधील पीडीपी कार्यालय सील करण्यात आले आहे. तर शांततेत आंदोलन करणाऱ्या पीडीपीच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

श्रीनगर (Shrinagar). केंद्र सरकारच्या नव्या भूमी कायद्याला विरोध करीत पीडीपीने गुरुवारी काश्मीरमध्ये आंदोलन केले. पोलिसांनी या आंदोलनावर कारवाई करीत पीडीपी नेते खुर्शीद आलम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना अटक केली. दरम्यान, जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी पीडीपीचे कार्यालय सील केले आहे, अशी माहिती जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांनी टि्वट करून दिली. महबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकावरही टीका केली आहे. श्रीनगरमधील पीडीपी कार्यालय सील करण्यात आले आहे. तर शांततेत आंदोलन करणाऱ्या पीडीपीच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

अशाच एका आंदोलनाला जम्मूमध्ये परवानगी देण्यात आली. मात्र, श्रीनगरमध्ये आंदोलन रोखण्यात आले. ही तुमची सामान्य परिस्थितीची परिभाषा आहे का, असा सवाल त्यांनी टि्वटमधून केला.

पीडीपी कार्यालयावर फडकवला होता तिरंगा
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी कार्यालयावर देखील तिरंगा ध्वज फडकवला होता. जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांची जवळपास 8 महिन्यांनंतर नजरकैदैतून सुटका करण्यात आली आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत, जोपर्यंत जम्मू काश्मीरला विशेष दर्जा प्राप्त होत नाही. तोपर्यंत आम्ही तिरंगा फडकवणार नाही, असे म्हटले होते. त्यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

रमजान हुसैन भाजपात
पीडीपीला आणखी एका ज्येष्ठ नेत्याने जोरदार धक्का दिला आहे. पीडीपीचे नेते रमजान हुसैन यांनी भाजपात दाखल होत जम्मू-काश्मीरची जनता देश आणि राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्या व्यक्तीचे कधीही समर्थन करू शकत नाही, अशी टीका केली आहे. भाजपकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात, पक्ष मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांनी पीडीपी नेते रमजान हुसैन यांचे स्वागत केले. हुसैन बसपाच्या तिकिटावर 2014 साली जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक लढले होते. मात्र, त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर ते पीडीपीत दाखल झाले होते. आता हुसैन यांनी पीडीपीतून राजीनामा दिला असून आपल्या समर्थकांसह भाजपात सामील झाले आहे. जम्मू-काश्मिरातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे आशान्वित झाली आहे, असा दावा रमजान हुसैन यांनी भाजप प्रवेशावेळी केला.