anti tank guided missile

भारताच्या संरक्षण मंत्रालयाने(defense ministry) १९ मार्च रोजी डिफेन्स पब्लिक सेक्टर अंटरटेकिंग कंपनी भारत डायनॅमिक्स लिमिटेडसोबत मोठा करार(defense ministry agreement with bharat dynamics) केला आहे. एकूण ४,९६० मिलन-२टी अँटी टँक गायडेड मिसाईलच्या(anti tank guided missiles) पुरवठ्याबाबत हा करार करण्यात आला आहे.

    दिल्ली: एकिकडे पाकिस्तान आणि चीनसारख्या देशांसोबत सीमेवर तणाव आहे तर दुसरीकडे भारत सरकार आपली लष्करी ताकदही वाढविण्याचे प्रयत्न करत आहे. दरम्यान, संरक्षण मंत्रालयाने १९ मार्च रोजी डिफेन्स पब्लिक सेक्टर अंटरटेकिंग कंपनी भारत डायनॅमिक्स लिमिटेडसोबत मोठा करार केला आहे. एकूण ४,९६० मिलन-२टी अँटी टँक गायडेड मिसाईलच्या पुरवठ्याबाबत हा करार करण्यात आला आहे.

    ही अँटी टँक गायडेड मिसाईल भारतीय लष्कराला सोपवण्यात येणार आहे. हा संपूर्ण करार १,११८८ कोटी रुपयांचा असल्याचेही सांगितले जात आहे. संरक्षण मंत्रालयानेदेखील याबाबत माहिती दिली. मिलन-२टी हे मिसाईल भारत डायनॅमिक्स लिमिटेडद्वारे फ्रान्सच्या एका संरक्षण क्षेत्रातील कंपनीकडून मिळालेल्या लायसन्सच्या अंतर्गत विकसित केले जात आहे. हे मिसाईल भारतीय लष्करात दाखल झाल्यानंतर लष्कराची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. भारत डायनॅमिक्सकडून सर्व ४,९६० मिलन-२टी अँटी टँक गायडेड मिसाईल्स मिळण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो.