केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर
केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर

शेतकरी आणि सरकारमध्ये सहमत न झाल्यानं हा मुद्दा अजूनही सोडवला गेलेला नाही. अशात आता केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे संकेत दिले आहेत.

    नवी दिल्ली – केंदाच्या कृषी कायद्यांविरोधात (New Farm Law) गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. शेतकरी आंदोलनाचा मुद्दा सोडवण्यासाठी शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये आतापर्यंत जवळपास अकरा वेळा बैठका झाल्या. या बैठकांमध्ये जवळपास ४५ तास चर्चा झाली. मात्र अनेक प्रयत्न करुनही हा मुद्दा अद्याप मार्गी लागलेला नाही.

    शेतकरी आणि सरकारमध्ये सहमत न झाल्यानं हा मुद्दा अजूनही सोडवला गेलेला नाही. अशात आता केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे संकेत दिले आहेत.

    मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) ग्वालियरमध्ये केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार आणि शेतकऱ्यांमधील गतिरोधक हटवण्याचा प्रयत्न केला जाईल. शेतकरी संघटनांनी हा मुद्दा सोडवण्याचा निर्णय घ्यावा असं आवाहन करताना ते म्हणाले, सरकार हा मुद्दा सोडवण्यासाठी मार्ग काढेल. केंद्र चर्चा करण्यासाठी तयार आहे आणि हा मुद्दा सरकारला सोडवायचा आहे.