भारत-चीनच्या वाढत्या पार्श्वभूमीवर, लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांचा लडाख दौरा

नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात झालेल्या सीमावादामुळे भारताचे २० जवान शहीद झाले होते. तर काही सैनिक जखमी झाले होते. त्यामुळे भारत आणि चीन यांच्यातील वाढत्या तणावामुळे लष्करी

 नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात झालेल्या सीमावादामुळे भारताचे २० जवान शहीद झाले होते. तर काही सैनिक जखमी झाले होते. त्यामुळे भारत आणि चीन यांच्यातील वाढत्या तणावामुळे लष्करी स्तरावर चर्चा होत आहेत. त्याचप्रमाणे या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी, लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे  हे लडाख दौऱ्यावर आहेत. तसेच दोन दिवसीय लेह-लडाख दौऱ्यात ते लष्कर ग्राऊंड कमांडर अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत.   

दोन दिवसीय दौऱ्याला लष्कर प्रमुख यांची सुरूवात झाली असून, सर्वप्रथम ते चीनी सैनिकांशी झालेल्या संघर्षात जखमी झालेल्या भारतीय जवानांना ते मिलिटरी रूग्णालयात भेट देणार आहेत. त्यानंतर १४ व्या कॉर्स्पचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंह यांची भेट घेतील. लेफ्टनंट सिंह या चर्चेचा सर्व तपशील लष्कर प्रमुख नरवणे यांना सांगतील.

याबरोबरच या पुढील आपली वाटचाल कशी असेल याबाबतही लष्कर प्रमुख मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. नरवणे यांच्यासोबत उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी हे सुद्धा चर्चेमध्ये सहभागी असणार आहेत. लष्कर प्रमुख सैन्याच्या तयारीसह चीनसोबत प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि एलओसी रेषेवर तैनात लष्कराची पाहणी करणार आहेत.