manoj naravane

लष्कर प्रमुख मनोज नरवणे(army chief manoj naravane) यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. ष्कर कुठल्याही अनपेक्षित परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे भारतीय लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे.

लष्कर प्रमुख मनोज नरवणे(army chief manoj naravane) यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. पूर्व लडाख सीमेवर चीन बरोबर सीमावाद सुरु आहे. या वादावर शांततामय मार्गाने तोडगा निघेल, अशी अपेक्षा आहे. मात्र लष्कर कुठल्याही अनपेक्षित परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे भारतीय लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे.

नरवणे यांनी म्हटले आहे की, “कुठल्याही संभाव्य घटनेचा सामना करण्यासाठी व्यूहरचनात्मक तयारी झाली आहे. देशाच्या उत्तर सीमेवर लष्कर पूर्णपणे सर्तक आहे. भविष्यातील आव्हानांचा सामना करण्याच्या दृष्टीने नवीन टेक्नोलॉजीचा समावेश करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे.”

ते पुढे म्हणाले की, “दहशतवाद कुठल्याही परिस्थितीत सहन करणार नाही, हा भारताने पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला आहे. पाकिस्तान सतत दहशतवादाला खतपाणी घालत आहे आणि दहशतवाद सहन न करण्याचं आमचं धोरण आहे.