जम्मू-काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन दरम्यान जवान कृष्णा वैद्य शहीद

गेल्या दोन दिवसांपासून जम्मू-काश्मीरमधील कृष्णा घाटी सेक्टर, बालाकोट सेक्टर आणि मनकोट सेक्टर परिसरात दहशतवाद्यांच्या विरोधात भारतीय सैन्य दलाकडून मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरू आहे. 23 जुलै रोजी भारतीय सैन्य दलाची एक तुकडी सर्च ऑपरेशन करत असताना कृष्ण वैद्य हे शहीद झाले आहेत.

    जम्मू-काश्मीरच्या कृष्णा घाटी सेक्टरमध्ये सैन्यदलाचा एक जवान शहीद झाला आहे. कृष्णा वैद्य असे या जवानचे नाव आहे. शुक्रवारी 23 जुलै रोजी देशाबद्दल आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले आहे.

    गेल्या दोन दिवसांपासून जम्मू-काश्मीरमधील कृष्णा घाटी सेक्टर, बालाकोट सेक्टर आणि मनकोट सेक्टर परिसरात दहशतवाद्यांच्या विरोधात भारतीय सैन्य दलाकडून मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरू आहे. 23 जुलै रोजी भारतीय सैन्य दलाची एक तुकडी सर्च ऑपरेशन करत असताना कृष्ण वैद्य हे शहीद झाले आहेत.

    जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी सकाळीच भारतीय सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. पोलीस आणि सैन्य दलाच्या संयुक्त टीमकडून दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई सुरू आहे.

    शुक्रवारी जम्मू-काश्मीर पोलिसांनी जम्मू जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात पाच किलोग्रॅम स्फोटक सामग्री (आयईडी) घेऊन जाणारं एक ड्रोन पाडलं. यासोबतच दहशतवाद्यांचा हल्ल्याचा डाव हाणून पाडला आहे. पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी रात्रीच्या सुमारास आंतरराष्ट्रीय सीमेवर कानाचक येथे एक ड्रोन दिसून आला त्यानंतर सुरक्षा दलाने हा संशयास्पद ड्रोन पाडला.

    दरम्यान, लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांक़डून या घटनेची चौकशी सुरु असून घटनास्थळीच तपास सुरू आहे. हिमाचल प्रदेशमधील हमीरपूर येथे राहणारे जवान कृष्ण वैद्य भारतीय सैन्याच्या सोळाव्या कोर्सेसमध्ये तैनात होते. पेट्रोलिंग दरम्यान हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.