देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच, २४ तासांतील रुग्णांचा आकडा चिंताजनक

गेल्या २४ तासात देशात ६० हजाराहून जास्त कोरोनाबाधित सापडले आहेत. कोरोनाबाधितांची संख्या जरी वाढत असली तरी देशात कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. देशात कोरोनामुक्तीचा टक्का जास्त आहे. तर कोरोनामुळे गेल्या २४ तासात १,००७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दिल्ली : देशात कोरोनाचा प्रकोप वाढताना दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस पसरत चालला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. गेल्या २४ तासात देशात ६० हजाराहून जास्त कोरोनाबाधित सापडले आहेत. कोरोनाबाधितांची संख्या जरी वाढत असली तरी देशात कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. देशात कोरोनामुक्तीचा टक्का जास्त आहे. तर कोरोनामुळे गेल्या २४ तासात १,००७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

देशात एकूण कोरोनाबाधिातांची संख्या २२ लाख १५ हजार ०७५ वर पोहोचली आहे. तर एकूण कोरोनाबाधितांपैकी ६ लाख १५ हजार ९५५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. १५ लाख ३५ हजार ७४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत ४४,३८८कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगभरात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत भारताचा ३ क्रमांक आहे.