असदुद्दीन ओवैसी म्हणाले मी ही पंतप्रधान मोदींसारखाच भावूक झालोय पण..

नवी दिल्ली:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येत श्री राम मंदिराचे भूमिपूजन पार पडले. मात्र या कार्यक्रमानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम)चे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी पंताप्रधानांच्या या कृतीवर  तीव्र आक्षेप  घेतला आहे   औवेसी म्हणाले की,  भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराची  पायाभरणी करत पंतप्रधानपदाच्या शपथविधीचे उल्लंघन केले आहे. आजच्या कार्यक्रमात मोदी सहभागी झाले म्हणून हिंदुत्वसाठी यशस्वी दिन आहे मात्र  त्यामुळे धर्मनिरपेक्ष तत्वांचे उल्लंघन झाले आहे. आज लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचा पराभव झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी  म्हणाले,   ‘   पंतप्रधानांनी या कार्यक्रमात सहभागी होऊ नये याबाबतची भूमिका  सुरुवातीपासून मी भूमिका मांडत आलो आहे. कारण  पंतप्रधान हे  कोणत्या विशिष्ट समुदायाचे नसतात. भारत देशाचा लोकशाही हा एकच धर्म असून आज याचा पराभव झाला असल्याचेही  ओवैसी यांनी म्हटले आहे. 

मी आज भावूक झालोय.. 

आजचा दिवस हा  हिंदुत्वसाठी यशस्वीतेचा असेल मात्र  या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सहभागी झाल्याने आज देशाच्या धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही तत्वांचा पराभव  झाला आहे. भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे. पंतप्रधानांनी  राममंदिराचा  शिलान्यास करून पंतप्रधानपदी विराजमान होताना घेतलेल्या  शपथविधीचे उल्लंघन केले आहे. ज्या प्रमाणे आज मोदी आज भावूक झाले त्याप्रमाणेच मी ही भावूक झालो आहे कारण तिथे ४५० वर्ष जुनी बाबरी मशीद होती मात्र  भाजप, संघाच्या लोकांनी ती पाडली असल्याचे औवेसी म्हणाले.