शौर्यचक्र विजेते बलविंदरसिंग यांची हत्या

तरण तारण : दहशतवाद्यांच्या काळात दहशतवाद्यांशी धैर्याने लढा देणार्‍या कॉम्रेड बलविंदरसिंग भिखीविंद यांची शुक्रवारी सकाळी राहत्या घरी हत्या करण्यात आली. काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंधाधूंद गोळीबार केला यात त्यांचा मृत्यू झाला. कॉम्रेड बलविंदरसिंग यांनी पंजाबमध्ये दहशतवाद्यांच्या काळात शिताफीने त्यांचा सामना केला होता.

तरण तारण : दहशतवाद्यांच्या काळात दहशतवाद्यांशी धैर्याने लढा देणार्‍या कॉम्रेड बलविंदरसिंग भिखीविंद यांची शुक्रवारी सकाळी राहत्या घरी हत्या करण्यात आली. काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंधाधूंद गोळीबार केला यात त्यांचा मृत्यू झाला. कॉम्रेड बलविंदरसिंग यांनी पंजाबमध्ये दहशतवाद्यांच्या काळात शिताफीने त्यांचा सामना केला होता. त्यांच्या जीवनावर अनेक टेली फिल्मही बनविण्यात आल्या आहेत. त्यांना शौर्य चक्रानेही सन्मानित करण्यात आले होते. दहशतवाद्यांनीच त्यांची हत्या केल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

याआधीही झाले होते हल्ले

कॉम्रेड बलविंदसिंग यांच्यावर याआधीही 20 वेळा मोठे हल्ले झाले होते. मात्र, प्रत्येकवेळी ते हल्ल्यातुन बचावले. ग्रेनेड आणि रॉकेट लॉन्चरने हल्ला करणाऱ्या कित्येक दहशतवाद्यांना त्यांनी यमसदनी धाडले होते. शुक्रवारी सकाळी सात वाजताच्या दरम्यान त्यांच्या घरात काही अज्ञातांनी प्रवेश करत पिस्तूलने बलविंदरसिंग यांच्यावर गोळीबार केला. त्यामुळे घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. हा हल्ला अतिरेकी होता की त्यात इतर कोणाचा हात आहे हे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. त्यांची सुरक्षा काही काळापूर्वीच मागे घेण्यात आली होती. याला कॉम्रेड बलविंदरसिंग यांनी विरोध केला होता.

कॉम्रेड बलविंदरसिंग यांचे भाऊ रणजितसिंग यांनी हा हल्ला अतिरेक्यांनी केल्याची शंका व्यक्त केली आहे. कॉम्रेड बलविंदरसिंग त्यांच्या घराशेजारी एक शाळा चालवत होते. सुमारे एक वर्षापूर्वी त्याच्यावर काही अज्ञात लोकांनी हल्ला केला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतरही घटनास्थळापासून काही अंतरावर भीखीविंद पोलिस स्टेशन असले तरी पोलिस अर्धा तास उशिराने दाखल झाले, त्यानंतर डीएसपी राजबीरसिंगही घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत.