corona vaccine

AstraZeneca ने युके आणि युरोपियन युनियनमधील लसीकरण(vaccination) झालेल्या १७ दशलक्षाहून अधिक व्यक्तींच्या आरोग्य अहवालाचे परीक्षण केले. त्यानंतरचा निष्कर्ष कंपनीने सादर केला आहे.

    AstraZeneca Plc या लसीमुळे रक्तात गाठी झाल्याचे कारण सांगत काही देशांनी या लसींचा वापर स्थगित केला होता. मात्र  AstraZeneca Plc ने याबाबत आता स्पष्टीकरण दिले आहे की, त्यांच्या कोविड-१९ प्रतिबंधक लसीद्वारे लसीकरण केलेल्या लोकांच्या रक्तात गाठी निर्माण झाल्याबद्दलचा कोणताही पुरावा मिळालेला नाही.

    AstraZeneca ने युके आणि युरोपियन युनियनमधील लसीकरण झालेल्या १७ दशलक्षाहून अधिक व्यक्तींच्या आरोग्य अहवालाचे परीक्षण केले. त्यानंतरचा निष्कर्ष कंपनीने सादर केला आहे.

    आयर्लंड, डेन्मार्क, नॉर्वे, आईसलँड आणि नेदरलँडमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी AstraZeneca ची लस घेतलेल्या लोकांच्या रक्तात गाठी निर्माण होण्याच्या मुद्दयावर गोंधळ घातला. या लसीचा वापर थांबवायला लावला. ऑस्ट्रियाने गेल्या आठवड्यामध्ये लसींची एक बॅच वापरणे थांबवले होते आणि याविषयीची चौकशी केली होती.

    जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, लसीकरणामुळे या घटना घडल्याच्या कोणत्याही खुणा दिसून येत नाहीत.

    AstraZeneca कंपनीच्या मते आम्ही आणि युरोपियन आरोग्य अधिकाऱ्यांनी अतिरिक्त चाचण्या घेतल्या आहेत. या  चाचण्यांपैकी कशातही चिंता करण्याचे कारण दिसून आलेले नाही. मासिक सुरक्षा अहवाल पुढील आठवड्यात EMA वेबसाइटवर लोकांसाठी प्रदर्शित केला जाईल.