howitzer

स्वदेशी बनावटीची हॉवित्झर(howitzer) ही जगातील सर्वोत्तम तोफ आहे. दूरवरच्या ४८ किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्यावर प्रहार करण्याची या तोफेची क्षमता आहे असे ही तोफ निर्माण करणाऱ्या संरक्षण संशोधन विकास संस्था म्हणजे डिआरडिओ (DRDO) च्या वैज्ञानिकाने सांगितले.

ATAGS हॉवित्झर तोफ प्रकल्पाचे संचालक आणि डीआरडीओचे वरिष्ठ वैज्ञानिक शैलेंद्र व्ही गाडे फिल्ड चाचणीवेळ‌ी सांगितले की,“ भारतीय लष्कराच्या सर्व गरजा पूर्ण करणारी ही स्वदेशी बनावटीची तोफ आहे. या क्षेत्रात आयातीची आवश्यकता नाही” असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, “चीन सीमेजवळ सिक्कीम आणि पाकिस्तान सीमेजवळ पोखरण येथे चाचणी दरम्यान ATAGS हॉवित्झरमधून दोन हजार राऊंडस फायर करण्यात आल्या आहेत”. “भारतीय लष्करात वापरात असलेली बोफोर्स आणि इस्रायलने जी ATHOS तोफ देण्याची तयारी दाखवलीय, त्यापेक्षा स्वदेशी ATAGS हॉवित्झरमधील सिस्टिम अधिक चांगली आहे”.