
चिनी सैनिक साध्या पेहरावात होते. ते स्थानिक लोकांशी चर्चा करत होते. कारण त्या भागात त्यांचीही जनावरे चरण्यास परवानगी हवी होती. पण स्थानिक रहिवाशांच्या तीव्र विरोधामुळे त्यांना परत जावे लागले.
लेह : पूर्व लडाखच्या (laddakh) न्योमा भागातील चांगथांग (changthang) गावात दोन गाड्यांमधून साधे कपडे परिधान (civilian dress) केलेले चिनी सैनिकांना (Chinese troops ) स्थानिक लोक आणि आयटीबीपी जवानांच्या मदतीने पळवून लावण्यात आले. स्थानिक लोकांनी प्रसारित केलेल्या व्हिडिओद्वारे रविवारी ही माहिती उघडकीस आली आहे.
साधा पेहराव करुन चीनी सैनिकांचा घुसखोरीचा प्रयत्न
चिनी सैनिक साध्या पेहरावात होते. ते स्थानिक लोकांशी चर्चा करत होते. कारण त्या भागात त्यांचीही जनावरे चरण्यास परवानगी हवी होती. पण स्थानिक रहिवाशांच्या तीव्र विरोधामुळे त्यांना परत जावे लागले. स्थानिकांनी आयटीबीपी जवानांनाही याबाबत माहिती दिली. काही दिवसांपूर्वी ही घटना घडली होती.
जोरदार निषेधानंतर परत जाऊ लागले
व्हिडिओमध्ये सिव्हील ड्रेसमध्ये चिनी सैनिकांचा एक गट असणारी दोन चायनीज वाहने चांगथांगमधील भारतीय हद्दीत प्रवेश करत असल्याचे दिसून आले. मात्र, स्थानिकांच्या कडक विरोधामुळे त्यांना परत जावे लागले. मात्र, त्यांना सामोरे जाण्यासाठी आयटीबीपी जवानही कारवाईवर आले.