जाहिरातीच्या जागेसाठी राणा कपूरच्या बंगल्याचा लिलाव

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राणा कपूरची ७९२ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. राणाच्या दक्षिण मुंबईत अनेक अपार्टमेंटस् आणि इंडिपेंडेंट रेसिडेंशियल बिल्डिंग आहेत. मात्र, या संदर्भात इंडियाबुल्स हाऊसिंगने वर्तमानपत्राला कोणतेही उत्तर दिले नाही.

    दिल्ली : येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. त्याच्या दिल्लीस्थित बंगल्याचा लिलाव इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्सने ११४ कोटी रुपयांमध्ये केला आहे. इंडियाबुल्सने ब्लिस व्हिलासाठी लोन दिले होते. याची हमी राणा कपूर यांची होती. ही प्रॉपर्टी दिल्लीच्या कौटिल्य मार्कवर आहे. या प्रकरणाची माहिती असलेले तीन लोक म्हणाले की, इंडिया बुल्सने दिल्लीस्थित रिअल इस्टेट डेव्हलपरला ११४ कोटी रुपयांना विकले होते.

    -१२३५ चौरस यार्डात बंगला
    इंडियाबुल्सने यावर्षी जानेवारीत ही प्रॉपर्टी ताब्यात घेतली होती. राणा कंपनीसाठी ८३.४३ कोटी, ६९.८८ कोटी आणि ८६.५६ कोटी रुपयांची तीन कर्जे डिफॉल्ट केली होती. राणांचा हा बंगला १२३५ चौरस यार्डात बनविण्यात आला आहे. यात तळ मजल्याव्यतिरिक्त आणखी दोन मजले आहेत.

    -ईडीने ही ७९२ कोटींची संपत्ती जप्त केली
    मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राणा कपूरची ७९२ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. राणाच्या दक्षिण मुंबईत अनेक अपार्टमेंटस् आणि इंडिपेंडेंट रेसिडेंशियल बिल्डिंग आहेत. मात्र, या संदर्भात इंडियाबुल्स हाऊसिंगने वर्तमानपत्राला कोणतेही उत्तर दिले नाही. राणा कपूरची मुलगी राधानेही या प्रकरणाबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे. राणा कपूरला गेल्या वर्षी मार्चमध्ये ईडीने अटक केली होती आणि सध्या ते नवी मुंबईतील तळेजा जेलमध्ये आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राणा कपूर, त्यांची पत्नी आणि तीन मुलींची चौकशी ईडी करीत आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार कपूर ने येस बँक चालवत असताना चुकीच्या पद्धतीने कर्जे वाटून त्यांनी ४३०० कोटी रुपयांचा फायदा मिळविला होता.