वॉलमार्ट, फ्लिपकार्ट, फोन पे आणि वॉलमार्ट फाऊंडेशनतर्फे भारतात महासंकटाशी मुकाबला करण्यासाठी जागतिक स्रोतांची उपलब्धता

वैद्यकीय ऑक्सिजनच्या पुरवठ्याची भारतातील तातडीची गरज भागवण्यात साह्य करण्यासाठी वॉलमार्टची जगभरातील व्यवसायकेंद्रे एकत्र येत आवश्यक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट आणि इतर साहित्य मिळवण्यासाठी काम करणार आहेत. ऑक्सिजनची साठवणूक आणि वाहतुकीसाठी वॉलमार्टतर्फे २० ऑक्सिजन निर्मिती प्लांट्स आणि २० क्रायोजेनिक कंटेनर्स पुरवण्यात येणार आहेत. तसेच रुग्णांना घरी किंवा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी ३००० हून अधिक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणि ५०० ऑक्सिजन सिलेंडर्सही देण्यात येणार आहेत.

    बेंगळुरू : वॉलमार्टतर्फे भारतातील कोविड-१९ मदतकार्याला हातभार लावण्यासाठी त्यांच्या जागतिक स्रोतांचा अधिक व्यापक प्रमाणात वापर करण्यात येणार आहे. वॉलमार्ट, द वॉलमार्ट फाऊंडेशन, फ्लिपकार्ट आणि फोनपे यांच्या सहकार्याने वॉलमार्टचे ग्लोबल टेक्नॉलॉजी ॲण्ड सोर्सिंग हब्स एकत्र येत ऑक्सिजन तुटवड्याची समस्या, राष्ट्रीय लसीकरण मोहीमेला पाठबळ यात साह्य करणार आहे आणि विविध संस्थांना दान देऊन देशभरातील समुदायांमध्ये सकारात्मक बदल आणणार आहे.

    “वॉलमार्ट हे एक जागतिक कुटुंब आहे. या विध्वंसक आजाराचा परिणाम भारतभरातील आमचे सहकारी, कुटुंब आणि मित्रपरिवारावर झाला आहे आणि शक्य ता पद्धतीने त्यांना साह्य करण्यासाठी आपण एकत्र येणे फार महत्त्वाचे आहे,” असे वॉलमार्ट इन्क.चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डोग मॅकमिलन म्हणाले. “संकटसमयी आमच्या स्रोतांचा वापर करणे आम्हाला आवश्यक वाटते आणि ही परिस्थिती तशीच आहे. वॉलमार्टच्या जागतिक क्षमता आणि फ्लिपकार्टच्या वितरण जाळ्याच्या क्षमता एकत्र आणून ज्यांना अत्यंत आवश्यकता आहे अशांना ऑक्सिजन आणि इतर बाबी उपलब्ध होतील, याची खातरजमा केली जाणार आहे. भारतातील प्रत्येकासाठी आमच्या हृदयात सहवेदना आहे.”

    वैद्यकीय ऑक्सिजनच्या पुरवठ्याची भारतातील तातडीची गरज भागवण्यात साह्य करण्यासाठी वॉलमार्टची जगभरातील व्यवसायकेंद्रे एकत्र येत आवश्यक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट आणि इतर साहित्य मिळवण्यासाठी काम करणार आहेत. ऑक्सिजनची साठवणूक आणि वाहतुकीसाठी वॉलमार्टतर्फे २० ऑक्सिजन निर्मिती प्लांट्स आणि २० क्रायोजेनिक कंटेनर्स पुरवण्यात येणार आहेत. तसेच रुग्णांना घरी किंवा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी ३००० हून अधिक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणि ५०० ऑक्सिजन सिलेंडर्सही देण्यात येणार आहेत. जगभरातून ही सामुग्री मिळवून भारतातील हॉस्पिटल आणि एनजीओजना वितरणासाठी देण्यात येतील.

    वॉलमार्ट आणि वॉलमार्ट फाऊंडेशनतर्फे यूएस-इंडिया बिझनेस कौन्सिल आणि यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमच्या संयुक्त साह्य उपक्रमाचा भाग म्हणून अतिरिक्त २५०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स पुरवले जाणार आहेत.

    हे प्रयत्न अधिक व्यापक करतानाच वॉलमार्ट फाऊंडेशनतर्फे भारतातील विविध एनजीओजना साह्य करण्यासाठी १४८.२ दशलक्ष (२ दशलक्ष डॉलर्स) इतकी रक्कम देणगी म्हणून देण्यात आली आहे. वॉलमार्ट फाऊंडेशन डिझॅस्टर रीलिफ फंड या दाता मार्गदर्शक फंडाच्या माध्यमातून एकूण ७४.१ दशलक्ष (१० लाख डॉलर्स)चा निधी दिला जाणार आहे. ‘डॉक्टर्स फॉर यू’तर्फे आयसोलेशन केंद्र आणि तात्पुरती हॉस्पिटल्स चालवण्यात साह्य करणे तसेच आघाडीवरील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) पुरवण्यासाठी यातून साह्य केले जाणार आहे. ७४.१ दशलक्ष (१० लाख डॉलर्स) चा वेगळा निधी गिव्ह फाऊंडेशन इन्कला दिला जाणार आहे. गिव्ह इंडियाच्या कोविड साह्य निधीला ही मदत दिली जाईल. यातून भारतातील वैद्यकीय क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि उपकरणांसाठी साह्य केले जाईल शिवाय यातून अधिक परिणाम झालेल्या आणि अरक्षित गटाला प्राधान्य दिले जाणार आहे.

    वॉलमार्ट, फ्लिपकार्ट आणि फोनपे सातत्याने कोविड-१९ लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेणार आहेत. यात त्यांचे असोसिएट्स आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी, तसेच फ्लिपकार्ट आणि फोनपेचे पूर्ण वेळ काँण्ट्रॅक्टर्स आणि डिलिव्हरी कामगार अशा २००,००० हून अधिक लोकांसाठी मोफत ऑन-साईट लसीकरण सेवा दिली जाणार आहे. असोसिएट्स आजारी पडल्यास किंवा त्यांना सेल्फ-आयसोलेशनमध्ये राहण्याची आवश्यकता असल्यास तसेच लसीकरण, चाचणी करण्यासाठी जाणे यासाठी यापुढेही त्यांना अतिरिक्त सिक लिव्ह दिल्या जातील. तसेच कुटुंबातील आजारी व्यक्तीची काळजी घेण्यासाठी अतिरिक्त कम्पॅशनेट केअर लिव्हही दिल्या जातील.

    फ्लिपकार्टने मुंबई, दिल्ली आणि बंगळुरुमधील कोविड-१९ केंद्रे, धर्मादाय रुग्णालये आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना ऑक्सिजन, पीपीई किट्स, हँड सॅनिटायझर्स आणि इतर आवश्यक गोष्टींचा पुरवठा करण्यासाठी निधी गोळा करण्यासाठी गिव्ह इंडियासोबत भागीदारी केली आहे. त्याचप्रमाणे, फ्लिपकार्ट ग्राहकांना आता त्यांच्याकडील सुपरकॉईन्स (लॉयल्टी पॉईंट्स)चा वापर करून ॲम्ब्युलन्स सेवा आणि ऑक्सिजन सिलेंडरच्या मदतीसाठी देणगी देता येईल. गरजूंना मदत करण्यासाठी गिव्हइंडियातर्फे या निधीचा वापर केला जाईल.

    फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती म्हणाले, “या संकटकाळात आमच्या व्यावसायिक भागीदारांना सुरक्षित पुरवठा साखळी आणि विश्वासार्ह व्यासपीठाच्या माध्यमातून साह्य करतानाच आमच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याचाही प्रयत्न केला आहे. आम्ही आणि फोनपेमधील आमचे सहकारी या कठीण काळात लोकांना साह्य करण्यासाठी आमचा खारीचा वाटा उचत आमच्या लॉजिस्टिक क्षमता आणि स्रोतांचा वापर रुग्ण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी करत आहोत. नागरिक आणि कॉर्पोरेशन्स एकत्र येत या संकटाचा सामना करण्यासाठी विविध स्रोतांचा वापर करत असताना आपण एकत्र येऊन या परिस्थितीवर मात करू हा आमचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.”

    याआधी, वॉलमार्ट, फ्लिपकार्ट ग्रुप आणि वॉलमार्ट फाऊंडेशनने भारतात आर्थिक आणि इतर साह्यासाठी ४६० दशलक्ष (६.२ दशलक्ष) रुपयांची मदत देऊ केली आहे. यात १० लाख पीपीई आणि सीपीई गाऊन्स, ६००,००० एन९५ मास्क आणि ८८ वेंटिलेटर्स तसेच इतर साह्याचा समावेश आहे.

    वॉलमार्ट कॅनडातर्फेही कॅनडियन रेड क्रॉस इंडिया कोविड-१९ रीस्पॉन्स अपीलच्या माध्यमातून मदतीचे प्रयत्न केले जात आहे. यातून रुग्णांसाठी ॲम्ब्युलन्स आणि वाहतूक सेवा, क्वॉरंटाईन आयसोलेशन केंद्रे आणि इतर सेवा पुरवल्या जात आहेत.