ब्लॅक फंगसवरील आयुर्वेदिक औषध बाजारात येत असल्याची दिली माहिती ; रामदेव बाबांचा नवा दावा

पतंजली आयुर्वेद लिमिटेड आणि पतंजली योगपीठातील या औषधासंदर्भातील काम आणि आवश्यक औपचारिकता जवळजवळ पूर्ण झाल्या आहेत. ब्लॅक, व्हाइट आणि येलो फंगससाठी तयार करण्यात आलेल्या या औषधाचं शेवटच्या टप्प्यातील काम सुरू आहे. बाबा रामदेव म्हणाले, की सध्या सुरू असलेल्या विवादामध्येही त्यांनी लोकांच्या सेवेसाठी काम सुरुच ठेवलं आणि माघार घेतली नाही.

    नवी दिल्ली : देशभरात कोरोनाची दुसरी लाट (2nd Wave of Corona) ओसरत असतानाच ब्लॅक फंगसनं (Black Fungus) आता चिंतेत भर घातली आहे. अशात, रामदेव बाबा (Baba Ramdev) आणि त्यांचे निकटवर्ती आचार्य बाळकृष्ण यांनी एका आठवड्याच्या आत फंगसवर आयुर्वेदिक औषध लॉन्च करणार असल्याचा दावा केला आहे.

    त्यांनी असाही दावा केला आहे, की पतंजली आयुर्वेद लिमिटेड आणि पतंजली योगपीठातील या औषधासंदर्भातील काम आणि आवश्यक औपचारिकता जवळजवळ पूर्ण झाल्या आहेत. ब्लॅक, व्हाइट आणि येलो फंगससाठी तयार करण्यात आलेल्या या औषधाचं शेवटच्या टप्प्यातील काम सुरू आहे. बाबा रामदेव म्हणाले, की सध्या सुरू असलेल्या विवादामध्येही त्यांनी लोकांच्या सेवेसाठी काम सुरुच ठेवलं आणि माघार घेतली नाही.