children infected with corona

लहान मुलांच्या बचावासाठी गाईडलाईन(Guidelines for saving children from corona ) जारी करण्यात आली आहे. त्यात लहान मुलांची इम्युनिटी वाढवण्यावर अधिक जोर देण्यात आला आहे. 

  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा(Corona Third Wave) लहान मुलांना(Small Children) सर्वाधिक धोका असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या बचावासाठी गाईडलाईन(Guidelines for saving children from corona ) जारी करण्यात आली आहे. त्यात लहान मुलांची इम्युनिटी वाढवण्यावर अधिक जोर देण्यात आला आहे.

  नवी दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानचे बालरोग तज्ज्ञ डॉ. एस. राजगोपाल यांनी एका मुलाखतीत याविषयी माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण खूप कमी आहे. मात्र, तरीही एक विशेष किट तयार करण्यात आलं आहे. त्याच्या सेवनानंतर मुलांची प्रतिकारशक्ती अधिक वाढते, असं सांगितलं.

  गाईडलाईननुसार लहान मुलांचं त्यांच्या वयानुसार वर्गीकरण करण्यात आलं आहे. त्यात १० ते १५, ५ ते १० आणि ५ वर्षापासून त्या खालील मुलांचे गट निर्माण केले आहेत. मुलांना या वयोगटानुसारच औषध देण्यास सांगण्यात आलं आहे. ताप आला तर आयुष ६४ हे औषध देण्याचं गाईडलाईनमध्ये नमूद करण्यात आल्याचं राजगोपाल यांनी सांगितलं.

  मोठ्या माणसांप्रमाणेच लहान मुलांनीही बिहेविअर प्रोटोकॉलचा वापर सुरू करावा, असं गाईडलाईनमध्ये म्हटलं आहे. त्यानुसार आई-वडिलांना आयुर्वेदिक औषधांचा खास वापर करण्यास सांगण्यात आलं आहे. तसेच कोमट पाण्याने गुळण्या करण्याचा सल्लाही लहान मुलांना देण्यात आला आहे, असं राजगोपाल यांनी स्पष्ट केलं.

  आयुष मंत्रालयाच्या गाईडलाईनमध्ये लहान मुलांच्या हालचालींकडेही लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. केवळ तापच नव्हे तर मुलांच्या हालचाली कमी झाली तरी तात्काळ डॉक्टरांना दाखवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

  गाईडलाईनमध्ये मोहरीच्या तेलाचा वापर करणे बंधनकारक केलं आहे. मोहरीचं तेल कोरोना संरक्षण कवच म्हणून काम करत असल्याचा दावा केला जात आहे. या तेलामुळे नाकातून कोरोनाचा संसर्ग होत नसल्याचंही बोललं जात आहे. लहान मुलांना या तेलाचा दररोज वापर करण्यास सांगण्यात आलं आहे.

  कोरोनाचा संसर्ग झाल्यावर रुग्णांना साधारणपणे आयसोलेशनमध्ये पाठवलं जातं. अशावेळी लहान मुलांना आयसोलेट केलं तर त्यांच्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे लहान मुलांवर विशेष लक्ष देण्यास सांगण्यात आलं आहे. त्यासाठी आयुष मंत्रालयाने पालकांसाठी वेगळी गाईडलाईन जारी केली आहे.