इंडियन मेडिकल असोसिएशनचा योगगुरू बाबा रामदेवांना दणका; १ हजार कोटी रुपयांचा ठोकला मानहानीचा दावा

इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) बाबा रामदेव यांच्यावर अ‍ॅलोपॅथी उपचाराविरूद्ध खोटा प्रचार केल्याचा आरोप केला होता. आयएमएने रामदेव यांना कायदेशीर नोटीस पाठविली. रामदेव यांच्यावर खटला चालविण्याची मागणीही डॉक्टरांच्या समितीने केली होती. मात्र रामदेव यांच्या पतंजली या संस्थेने हे आरोप खोटे असल्याचा निषेध करत निवेदन जारी केले होते.

  देहरादून: इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) उत्तराखंडने आज ( बुधवारी ) योगगुरू बाबा रामदेव यांच्यावर १ हजार कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. असोसिएशनने हे प्रकरण बाबा रामदेव सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या आधारे केले आहे, ज्यामध्ये बाबा अ‍ॅलोपॅथीला उपचाराला बकवास व कचरा विज्ञान म्हटले आहे.

  मात्र, या घटनेवर नंतर रामदेव बाबांनी त्यांचे वक्तव्य मागे घेतले. पंरतु आयएमएच्या म्हणण्यानुसार रामदेव यांनी दिलेल्या निवेदनाला उत्तर म्हणून, जर त्यांनी येत्या १५ दिवसांत सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ काढला नाही आणि लेखी माफी मागितली नाही तर त्यांच्याकडून १ हजार कोटी रुपयांची भरपाई मागितली जाईल, अशी नोटीस त्यांना पाठवण्यात आली आहे.

  इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) बाबा रामदेव यांच्यावर अ‍ॅलोपॅथी उपचाराविरूद्ध खोटा प्रचार केल्याचा आरोप केला होता. आयएमएने रामदेव यांना कायदेशीर नोटीस पाठविली. रामदेव यांच्यावर खटला चालविण्याची मागणीही डॉक्टरांच्या समितीने केली होती. मात्र रामदेव यांच्या पतंजली या संस्थेने हे आरोप खोटे असल्याचा निषेध करत निवेदन जारी केले होते.

  रामदेव यांनी डीजीसीआयच्या विश्वासार्हतेला आव्हान दिले
  ‘रामदेव यांनी असा दावा केला आहे की रेमेडसवीर, फॅविफ्लू आणि डीजीसीआय व्यतिरिक्त कोट्यवधी लोकांचा मृत्यू ड्रग्समुळे झाला. त्यांनी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीजीसीआय) आणि आरोग्यमंत्री यांच्या विश्वासार्हतेला आव्हान दिले आहे, असे आयएमएने लिहिले आहे. जून-जुलै २०२० मध्ये कोरोना रूग्णांच्या उपचारांमध्ये रेमाडेसिविरच्या वापरास केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (सीडीएससीओ) ने मान्यता दिली. हे भ्रम पसरवण्यासाठी आणि कोट्यावधी लोकांचे जीवन धोक्यात आणल्याबद्दल बाबा रामदेव यांच्यावर खटला चालवायला हवा.

  यापूर्वीही वादग्रस्त विधाने केल्याचा आरोप
  आयएमएने पत्रात लिहिले आहे, की यापूर्वी कोरोनासाठी बनविलेले औषध लाँच करतानाही रामदेव यांनी डॉक्टरांना मारेकरी म्हटले होते. या कार्यक्रमात आरोग्यमंत्रीही उपस्थित होते. सर्वांना ठाऊक आहे की बाबा रामदेव आणि त्यांचे साथीदार बाळकृष्ण आजारी असताना अ‍ॅलोपॅथी उपचार करतात. यानंतरही, त्यांची अवैध औषधे विक्रीसाठी अ‍ॅलोपॅथीबद्दल सतत भ्रम पसरवत आहेत. याचा परिणाम मोठ्या लोकसंख्येवर होत आहे.