सावधान ! तुम्ही वापरत असलेल्या ‘ब्रँडेड’ मधात भेसळ ; गोडव्यासाठी वापरतात  साखरेचं सिरप

आरोग्य राखण्यासाठी आपण मधाचा वापर करत असतो. तसेच कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी मधाची विक्री वाढली आहे परंतु, सध्या बाजारात मिळणाऱ्या कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवणं अशक्यचं.याला 'ब्रँडेड' कंपन्याही अपवाद नाहीत. बाजारात विकल्या जाणाऱ्या ८० टक्के लहान-मोठ्या कंपन्यांच्या मधात भेसळ असल्याचे सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (सीएसई) संस्थेच्या बुधवारी जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे.

आरोग्य राखण्यासाठी आपण मधाचा वापर करत असतो. तसेच कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी मधाची विक्री वाढली आहे परंतु, सध्या बाजारात मिळणाऱ्या कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवणं अशक्यचं.याला ‘ब्रँडेड’ कंपन्याही अपवाद नाहीत. बाजारात विकल्या जाणाऱ्या ८० टक्के लहान-मोठ्या कंपन्यांच्या मधात भेसळ असल्याचे सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (सीएसई) संस्थेच्या बुधवारी जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे.

मधुर गोडव्यासाठी सारख सिरपचा वापर
जर्मनीत १३ ब्रँड्सच्या २२ नमुन्यांची चाचणी झाली. यात डाबर, पतंजली, एपिल हिमालय, वैद्यनाथ, झंडू, नेचर्स नेक्टर, हिमारी, सफोला, मार्कफेड सोहना, ददेव, अंडिजिनियस, हाय व सोसायटी नॅच्युरले या ब्रँडच्या मधाचा समावेश होता. यापैकी केवळ ५ नमुनेच शुद्ध आढळले. विशेष म्हणजे यातील मोठे ब्रँड देशातील प्रयोगशाळेत भारतीय मानकांवर खरे उतरले होते. मात्र जर्मनीत तपासलेल्या नमुन्यात भेसळ आढळून आली आहे. सीएसईने दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील बाजारात विक्री केल्या जाणाऱ्या जवळपास सर्वच प्रमुख ब्रँडमध्ये मोठी भेसळ करण्यात येत आहे. या भेसळीत डाबर, पतंजली, झंडु, बैद्यनाथ अशा बड्या कंपन्यांचं नावही सामिल आहे. सीएसईनुसार, बाजारात विक्रीसाठी असणाऱ्या मधात शुगर सीरपची भेसळ केली जाते, जी आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे.

भेसळीच चिनी कनेक्शन
CSE च्या महासंचालक सुनिता नारायण यांनी सांगितलं की आंतरराष्ट्रीय स्तरावरील न्यूक्लियर मॅग्नेटिक रेजोनेन्स स्पेक्ट्रोस्कोपी (NMR) चाचणीअंतर्गत मधाची तपासणी करण्यात आली. या चाचणीवेळी १३ पैकी केवळ ३ ब्रँडच पास होऊ शकले. मधातील अशाप्रकारची गंभीर भेसळ हे एक प्रकराचं फूड फ्रॉड आहे. मधाची शुद्धता तपासण्यासाठी, भारतीय मानकांद्वारे अशाप्रकारची भेसळ पकडणं सोपं नाही. परंतु चीनी कंपन्या अशा प्रकराचं शुगर सीरप तयार करतात, जे भारतीय मानकांद्वारे सहजपणे पकडलं जाईल. ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरत असल्याचं, सुनिता नारायण यांनी सांगितलं.

डाबर आणि पतंजली कंपन्यांकडून आरोपाचे खंडन
बुधवारी डाबर आणि पतंजली या दोन्ही कंपन्या विकत असलेल्या मधात साखर सिरप (साखर) मिसळले जात आहेत, असा दावा सीएसईने (CSE) केला होता. आता या दोन्ही कंपन्यांनी दाव्याचे खंडन केले आहे. कंपन्यांनी म्हटले आहे की, हे दावे ब्रँड्सची प्रतिमा खराब करण्यासाठी केले आहेत. डाबरच्या प्रवक्त्याने सांगितले की, आमची ब्रँड प्रतिमा खराब करणे हे लक्ष्य असू शकते. आम्ही आमच्या ग्राहकांना विश्वास देतो की, डाबर मध १००% शुद्ध आणि देशी आहे. ह मध भारतीय स्त्रोतांकडून नैसर्गिक पद्धतीने गोळा केले जाते आणि साखर किंवा इतर भेसळयुक्त पदार्थ न घालता पॅक केले जाते.पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण म्हणाले की, भारतीय नैसर्गिक मध उद्योग आणि उत्पादकांची बदनामी करण्याचे हे षडयंत्र असल्याचे दिसते आहे. जेणेकरून एखाद्या प्रोसेस केलेल्या मध कंपनीला प्रोत्साहन मिळेल.