जेईई परीक्षेला सुरूवात, केंद्रांवर पोहोचण्यास परीक्षार्थींची कसरत

परीक्षा केंद्रावर गर्दी होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना एकत्र न बोलवता काही केंद्रांवर ठराविक अर्धा तासाच्या अंतराने बोलवलं आहे ही परीक्षा केंद्रांवर सुरळीतपणे घेण्यात यावी असं केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या नियमावलीत म्हटलं आहे.

देशभरात आजपासून जेईई (JEE EXAM) परीक्षा घेतली जाणार असून दोन सत्रांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. १ ते ६ सप्टेंबर दरम्यान आज सकाळी ९ वाजल्यापासून परीक्षेला सुरूवात होणार आहे. तसेच ९ ते १२ आणि दुपारी ३ ते ६ या सत्रांमध्ये जेईईची मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा केंद्र वाढवण्यात आले असून, विद्यार्थ्यांची एका वर्गातील संख्या सुद्धा २४ हून १२ इतकी करण्यात आली आहे. जेईई आणि नीट परीक्षा देणाऱ्या मुंबई आणि उपनगरातील परीक्षार्थींना लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्याची परवानगी मिळाली आहे.

परीक्षेसाठी असणारे ॲडमिट कार्ड पाहून रेल्वे स्टेशनमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. परीक्षा केंद्रावर गर्दी होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना एकत्र न बोलवता काही केंद्रांवर ठराविक अर्धा तासाच्या अंतराने बोलवलं आहे. ही परीक्षा केंद्रांवर सुरळीतपणे घेण्यात यावी असं केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या नियमावलीत म्हटलं आहे. परंतु दुरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहोचताना विद्यार्थी आणि पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं दिसत आहे.