सावधान! SBI बँकेत खाते असेल तर ‘ही’ बातमी तुमच्यासाठी महत्वाची ; बँकेकडून ४४ कोटी ग्राहकांना अलर्ट! ग्राहकांच्या खात्यातून पैसे कसे चोरले जातात याचा व्हिडीओ व्हायरल

एसबीआयने एक व्हिडीओ प्रसिद्ध केलाय. त्या व्हिडीओमध्ये फसवणूक करणारा पहिल्यांदा ग्राहकाला कॉल करतो आणि म्हणतो की, मी तुमच्या एसबीआय गृह शाखेतून बोलत आहे. आपल्याला लवकरात लवकर केवायसी अद्ययावत, अन्यथा खाते बंद होईल. असे म्हटल्यावर ग्राहकही टेन्शनमध्ये येतात आणि त्यासाठी त्यांना कोणती कागदपत्रे द्यावी लागतील हे विचारलं जातं.

    नवी दिल्लीः देशात सर्वात जास्त लोकप्रिय असलेल्या एसबीआय बँकेने पुन्हा एकदा ग्राहकांना अलर्ट दिलाय. यामध्ये तब्बल ४४ कोटी ग्राहकांचा समावेश आहे. एसबीआय बँकेने म्हटले आहे की, ग्राहकांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण फसवणूक करणारे लोक नव्या पद्धतीनं लोकांच्या खात्यातून पैसे चोरतात. विशेष म्हणजे त्यासाठी बँकेने एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय.

    काय आहे संपूर्ण प्रकरण?
    एसबीआयने एक व्हिडीओ प्रसिद्ध केलाय. त्या व्हिडीओमध्ये फसवणूक करणारा पहिल्यांदा ग्राहकाला कॉल करतो आणि म्हणतो की, मी तुमच्या एसबीआय गृह शाखेतून बोलत आहे. आपल्याला लवकरात लवकर केवायसी अद्ययावत, अन्यथा खाते बंद होईल. असे म्हटल्यावर ग्राहकही टेन्शनमध्ये येतात आणि त्यासाठी त्यांना कोणती कागदपत्रे द्यावी लागतील हे विचारलं जातं. फसवणूक करणारा आधार कार्ड आणि पॅनकार्ड मागतो. यासाठी आपल्याला शाखेत जाण्याची आवश्यकता नाही. आताच बँकेतून आपले खाते अद्ययावत करत असल्याचं सांगितलं जातं. यासाठी ग्राहकाने एक अॅप डाऊनलोड करावे लागेल. यानंतर ते फोनचा एक्सेस घेऊन त्यात प्रवेश घेतात. ते त्वरित खाते केवायसी करत असल्याचं सांगतात. जेव्हा कोणताही ग्राहक फसवणुकीच्या बहाण्याखाली असे करतो, तेव्हा अनेक वैयक्तिक माहिती खात्याच्या रकमेसह फोनवरून चोरी केली गेलेली असते.

     

    हे कधीच विसरू नका
    एसबीआय म्हणतो की, ते कधीही कोणत्याही ग्राहकांना कॉल करत नाहीत आणि त्यांची वैयक्तिक माहिती विचारत नाहीत किंवा फोनवर प्रवेश करण्याची परवानगीही मागत नाहीत. म्हणून आपण हे विसरू नका.

    खात्यातून पैसे चोरी झाल्यास काय करावे?
    एखाद्याच्या खात्यातून पैसे चोरी झाल्यास तत्काळ हेल्पलाईन क्रमांकावर १५५२६० वर कॉल करा. वेळेवर बोलण्याने आपले पैसे वाचू शकतात. या हेल्पलाईनच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत २१ लोकांसाठी तीन लाख तेरा हजार रुपये वाचवू शकलो आहोत. जर आपण ऑनलाईन फसवणुकीचे बळी ठरले असाल तर वेळ न गमावता लगेच हेल्पलाईन नंबर १५५२६० वर कळवा. या ट्विटच्या माध्यमातून दिल्ली आणि राजस्थानसाठी १५५२६० हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे.