जर तुमचं बँक खातं ‘या’ बँकेमध्ये असेल तर सावधान, सायबर अटॅकर्सचा होतोय हल्ला; जाणून घ्या नाहीतर गमवाल…

जर तुमचं बँक खातं HDFC, ICICI, SBI, PNB, AXIS बँकेमध्ये असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. कारण काही सायबर अटॅकर्स या बँकेतील खातेदारांना आमिष दाखवून त्यांची गोपनिय माहिती चोरण्याच्या प्रयत्नात आहेत.

    मुंबई : नवी दिल्लीत असलेल्या सायबर सिक्युरिटी कंपनी ऑटोबोट इंफोसेकने सायबरपीस फाऊंडेशनसोबत केलेल्या एका तपासात ही माहिती समोर आलेली आहे. जर तुमचं बँक खातं HDFC, ICICI, SBI, PNB, AXIS बँकेमध्ये असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. कारण काही सायबर अटॅकर्स या बँकेतील खातेदारांना आमिष दाखवून त्यांची गोपनिय माहिती चोरण्याच्या प्रयत्नात आहेत.

    या सायबर गुन्हेगारांकडून खातेदारांना एक मेसेज पाठवला जातो, ज्यामध्ये एक लिंकही देण्यात आलेली आहे. या मेसेजमध्ये लोकांना सांगण्यात येत आहे की, जर तुम्हाला आयकराचा परतावा (Income Tax Return) हवा असेल, तर एक अर्ज पाठवा. त्या लिंकवर क्लिक केल्यावर एक फॉर्म उघडतो, जो अगदी इन्कम टॅक्सच्या वेबसाईटसारखाच दिसतो. मिळालेल्या माहितीनुसार ही लिंक अमेरिका आणि फ्रान्समधून हाताळण्यात येते. या सगळ्यात http चा वापर केला जात आहे, जेव्हा की https हे सगळ्यात सुरक्षित मानलं जातं.

    काही जणांना हे खोटे फॉर्म खरोखर वाटून त्यात ते सगळी माहिती भरतात. ज्यामुळे खातेदारांची गोपनिय माहिती जसं की आधार-पॅन नंबर, बँक खात्याचा नंबर, IFS कोड सायबर हॅकर्सच्या हाती लागते. यानंतर आता सरकारी यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे. वाढते सायबर हल्ले (cyber attack) पाहता सरकार डिजिटल इंटिलिजन्स यूनिट आणण्याच्या तयारीत आहे.