corona vaccine

भारत बायोटेकने(bharat biotech) एक निवेदन जारी केले आहे. त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे, “आमची क्लिनिकल ट्रायल ही दोन डोसवर आधारित आहे. त्यासाठी २८ दिवस द्यावे लागतात. म्हणजेच कोवॅक्सिन(covaxin) लसीची कार्यक्षमता ही दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनंतर निश्चित होत असते.” हरयाणाचे मंत्री अनिल विज यांनी क्लिनिकल ट्रायलदरम्यान दोन आठवड्यांपूर्वी कोवॅक्सिन लसीचा एक डोस घेतला होता. त्यानंतर ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

हैदराबादमधील भारत बायोटेकने(bharat biotech) ‘कोवॅक्सिन’(covaxin) ही कोरोनावरील लस विकसित केली आहे. या लसीचा डोस देण्यात आलेले हरयाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे या लसीबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली. त्यावर आता भारत बायोटेकने स्पष्टीकरण दिले आहे.

भारत बायोटेकने एक निवेदन जारी केले आहे. त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे, “आमची क्लिनिकल ट्रायल ही दोन डोसवर आधारित आहे. त्यासाठी २८ दिवस द्यावे लागतात. म्हणजेच कोवॅक्सिन लसीची कार्यक्षमता ही दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनंतर निश्चित होत असते.” हरयाणाचे मंत्री अनिल विज यांनी क्लिनिकल ट्रायलदरम्यान दोन आठवड्यांपूर्वी कोवॅक्सिन लसीचा एक डोस घेतला होता. त्यानंतर ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

कंपनीने पुढे म्हटलं की, “चाचणीचा भाग म्हणून ५० टक्के सहभागींना ही लस मिळाली तर इतरांना प्लेसबो देण्यात आला होता. फेज-३ मधील ट्रायल ही दुप्पट करण्यात आली होती. यामध्ये ५० टक्के सहभागींना लस देण्यात आली तर उर्वरितांना प्लेसबो देण्यात आला.”

अनिल विज यांनी स्वेच्छेने भारत बायोटेकच्या मानवी चाचणीत भाग घेतला होता. यामध्ये २५,००० पेक्षा अधिक लोकांना डोसेस देण्यात आले होते.  विज यांना २० नोव्हेंबर रोजी हा डोस देण्यात आला होता. त्याचबरोबर हरयाणातील ४०० लोकांनाही कोवॅक्सिनचा डोस देण्यात आला. यामध्ये रोहतकचे पीजीआयएमएस विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. ओ पी कार्ला यांचाही समावेश आहे.

भारत बायोटेकने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थान (एनआयव्ही) आणि दिल्लीतील इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) सोबत एकत्रितपणे कोरोनावर लस विकसित केली आहे.