made in india Covacin vaccine successfully tested on animals

लसीकरणादरम्यान काही केंद्रांवर कोव्हॅक्सिनच्या(covaxin) लसीला विरोध झाला. त्यामुळे कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकने घोषणा केली की, या लसीचे जर काही साईड इफेक्ट्स जाणवले तर कंपनी नुकसान भरपाई देईल.

भारतात आजपासून कोरोना लसीकरणाला(corona vaccination) सुरुवात झाली आहे. भारतात  सीरमच्या ‘कोविशिल्ड’(covishield) आणि भारत बायोटेकच्या(bharat biotech) ‘कोव्हॅक्सिन’ (covaxin)या दोन लसींना परवानगी देण्यात आली आहे. लसीकरणादरम्यान काही केंद्रांवर कोव्हॅक्सिनच्या लसीला विरोध झाला. त्यामुळे  कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकने घोषणा केली की, या लसीचे जर काही साईड इफेक्ट्स जाणवले तर कंपनी नुकसान भरपाई देईल.

कंपनीने आपल्या घोषणापत्रात म्हटलेे आहे की, “कोणत्याही प्रतिकूल किंवा गंभीर प्रतिकूल घटनेदरम्यान सरकारच्यावतीनं अधिकृत केंद्र आणि रुग्णालयांमध्ये चिकित्सिक स्वरुपात मान्यता प्राप्त मानकांनुसार, उपचारांची सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल.  लसीमुळे कोणताही साईड इफेक्ट झाला तर कंपनीकडून त्याची भरपाई देण्यात येईल.”

भारत बायोटेकची तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल अजुन बाकी आहे. त्यामुळे लोकांच्या मनात थोडे दडपण असण्याची शक्यता आहे. मात्र कंपनीने साईड इफेक्ट झाल्यास नुकसान भरपाईची तयारी दाखवली आहे. भारत सरकारने भारत बायोटेकला ५५ लाख कोव्हॅक्सिन डोसची ऑर्डर दिली आहे. लस घेतलेल्यांना एक फॅक्टशीट आणि एक फॉर्म देण्यात आला आहे. ज्याला लसीमुळे साईड इफेक्ट झाला आहे त्याने सात दिवसांच्या आत हा फॉर्म भरुन देणे आवश्यक आहे.