मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यांचा विहिरीत कोसळून मृत्यू, राहुल गांधी यांनी केला शोक व्यक्त

गंजबासौदामधील लालपठार गावात ही घटना घडली आहे. विहिरीमध्ये एक मुलगा पडला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी गावातील इतर लोकांना धाव घेतली होती. पण, मुलाला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात गावातील काही तरुण विहिरीत पडले. विहिरीच्या कठड्याजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या गर्दीत विहिरीचा कठडा तुटल्याने ३० ते ४० जण विहिरीत पडले.

    मध्यप्रदेश : मध्य प्रदेशातल्या विदिशा जिल्ह्यातल्या गंजबासोदा भागात ३० ते ४० लोक विहिरीमध्ये पडल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत २० जणांना वाचवण्यात यश आलं असून एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकाकडून बचावकार्य सुरु आहे.

    गंजबासौदामधील लालपठार गावात ही घटना घडली आहे. विहिरीमध्ये एक मुलगा पडला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी गावातील इतर लोकांना धाव घेतली होती. पण, मुलाला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात गावातील काही तरुण विहिरीत पडले. विहिरीच्या कठड्याजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या गर्दीत विहिरीचा कठडा तुटल्याने ३० ते ४० जण विहिरीत पडले.

    या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून अजूनही पाच जण विहिरीत अडल्याची माहिती असून त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. तर, मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी देखील तात्काळ मदतीचे आदेश दिले आहेत.

    दरम्यान, या प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला असून काँग्रेस कार्यकर्त्यांना शक्यती मदत करण्याचं आवाहन केलं आहे.