तिकीट आरक्षणाच्या नियमांमध्ये मोठा बदल, प्रवाशांना मिळणार एक खास सुविधा

१० ऑक्टोबरपासून ज्या विशेष रेल्वे सुरू होत आहेत, त्या सर्व रेल्वेंसाठी हा नियम लागू असणार आहे. प्रवशांना आता रेल्वे स्थानकामधून निघण्याच्या पाच मिनिटं अगोदरपर्यंत त्यांचे तिकीट बुक किंवा रद्द करता येणार आहे.

तिकीट आरक्षणाच्या नियमांमध्ये (Big change in ticket reservation rules) भारतीय रेल्वेने (Indian Railway) आज शनिवारपासून मोठे बदल केले आहेत. तसेच प्रवाशांसाठीही (passengers ) खास सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. १० ऑक्टोबरपासून ज्या विशेष रेल्वे सुरू होत आहेत, त्या सर्व रेल्वेंसाठी हा नियम लागू असणार आहे. प्रवशांना आता रेल्वे स्थानकामधून निघण्याच्या पाच मिनिटं अगोदरपर्यंत त्यांचे तिकीट बुक किंवा रद्द करता येणार आहे.

तिकीट बुकींगचा दुसरा चार्ट रेल्वे स्थानकातून निघण्याच्या अर्धातास अगोदर जाहीर केला जाणार आहे. भारतीय रेल्वेने स्थानकांमधून रेल्वेंच्या ठरलेल्या निघण्याच्या वेळेच्या अर्धातास अगोदर दुसरा बुकींग चार्ट तयार करण्याच्या मागील प्रणालीस आजपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांत कोरोना महामारीमुळे हा कालावधी रेल्वे निघण्याच्या दोन तास अगोदर असा केला गेला होता.

कोविड-१९ च्या अगोदर नियमांनुसार पहिला बुकींग चार्ट रेल्वे स्थानकातून निघण्याच्या ठरलेल्या वेळेच्या किमान चार तास अगोदर तयार केला जात होता. जेणेकरून उपलब्ध असलेल्या जागा दुसरा बुकींग चार्ट तयार होईपर्यंत, अगोदर जागा मिळव्यात या आधारावर पीआरएस काउंटर आणि इंटरनेटच्या माध्यमातून बुक करता येतील. असे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे.