मोठा निर्णय ! सरकारी नोकरीसाठी आता एकच सामायिक परीक्षा होणार

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सरकारी नोकरी मिळविण्यासाठी धडपडणाऱ्यां तरुणतरुणींसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.आता इच्छूक उमेदवारांना  वेगवेगळ्या नोकऱ्यांसाठी एकच सामायिक परिक्षा द्यावी लागणार आहे. बेरोजगार उमेदवारांचा ताण कमी व्हावा म्हणून National Recruitment Agency स्थापन करण्यात येणार आहे. त्याद्वारे एकच CET घेण्याचा  महत्त्वपूर्ण निर्णय आज  कॅबिनेट बैठकीत झाला.  याबाबतची  माहिती  केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.उमेदवारांना जागोजागी परीक्षा द्यायला जावं लागू नये म्हणून एकच सामान्य पात्रता परीक्षा असेल. यात गुणवत्ता सिद्ध करून उमेदवारांना पुढे जाण्याची संधी मिळू शकेल, असे  जावडेकर यावेळी म्हणाले. 

 

 फायदा काय ? 

शिक्षण झाल्यानंतर  सरकारी नोकरी शोधणाऱ्यांना विविध संस्थेच्या वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात  मात्र आता या निर्णयामुळे  इथून पुढे असे करण्याची गरज राहणार नाही.National Recruitment Agency  या संस्थेत एकदा नोंदणी केली की, एकच परीक्षा देऊन आपली योग्यता उमेदवारांना सिद्ध करावी लागेल.