२४ तासात कोरोना रूग्णसंख्येत मोठी घट, आजची काय आहे स्थिती ? : वाचा सविस्तर

गेल्या २४ तासांमध्ये देशातील कोरोनाच्या नव्या रूग्णाच्या संख्येत मोठी मोठी घट नोंदवली आहे. गेल्या काही दिवसांपासून एक लाखांच्या आता ८० हजारांपर्यंत खाली घसरले आहे. तर नव्या रूग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रूग्णांचेही प्रमाण वाढले आहे. पण चिंतेची बाब म्हणजे देशातील रोजच्या मृत्यूंची संख्या मात्र अद्यापही तीन हजारांच्या वर नोंदवली जात आहे.

    नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट ही अधिक धोकादायक असल्याने. यामध्ये कोरोनाचे संक्रमण अधिक वेगाने होत होते आणि मृत्यूदर सुध्दा पहिल्या लाटेपेक्षा अधिक होता. पण आता कुठे दुसरी लाट ही आटोक्यात येताना दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशातील कोरोनाच्या नव्या रूग्णाच्या संख्येत मोठी मोठी घट नोंदवली आहे. गेल्या काही दिवसांपासून एक लाखांच्या आता ८० हजारांपर्यंत खाली घसरले आहे. तर नव्या रूग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रूग्णांचेही प्रमाण वाढले आहे. पण चिंतेची बाब म्हणजे देशातील रोजच्या मृत्यूंची संख्या मात्र अद्यापही तीन हजारांच्या वर नोंदवली जात आहे.

    आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशांमध्ये कोरोनाच्या ८० हजार ८३४ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तसेच काल दिवसभरात देशात कोरोनामुळे तीन हजार ३०३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात १ लाख ३२ हजार रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाच्या सक्रिय रूग्णांचे प्रमाण अधिकच घटले आहे.

    दरम्यान, गेल्या २४ तासात ८० हजार ८३४ रूग्णांच्या वाढीमुळे देशातील एकूण रूग्णसंख्या ही २ कोटी ९४ लाख ३९ हजार ९८९ एवढी झाली आहे. काल दिवसभरात नोंद झालेल्या ३ हजार ३०३ मृत्यूमुळे देशातील आतापर्यंतच्या कोरोनाबळीच्या आकडा ३ लाख ७० हजार ३८४ वर पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशातील कोरोनामुक्त होणाऱ्या रूग्णांचे प्रमाण सतत वाढत असून, काल १ लाख ३२ हजार ०६२ रूग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे देशातील एकूण कोरोनामुक्त रूग्णांची संख्या २ कोटी ८० लाख ४३ हजार ४४६ एवढी झाली आहे.

    देशात सध्या १० लाख २६ हजार १५९ कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत. तर देशातील लसीकरणाचा वेगही वाढत आहे. आतापर्यंत २५ कोटी ३१ लाख ९५ हजार ४८ जणांना कोरोनाप्रतिबंधक लस घेतली आहे.