बिहारमध्ये नवनवर्षात मोठी राजकीय उलथापालथ!; राबडींचे नितीशांसाठी ‘रेड कार्पेट’

राचीच्या राजेंद्र इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेससच्या (रिम्स, राची) पेईंग वॉर्ड पुन्हा एकदा सत्तेच्या समीकरणाचे केंद्र ठरले आहे. कोट्यवधी रुपयांच्या चारा घोटाळ्याप्रकरमी शिक्षा भोगत असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजद सुप्रीमो लालूप्रसाद यादव तुरुंगातूनच सक्रिय झाले आहे.

  • महाआघाडीत सहभागी करण्याबाबत चर्चा करणार

पाटणा. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी माजी मुख्यमंत्री राबडीदेवी (rabdidevi) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे बिहारमध्ये मोठ्या राजकीय उलथापालथीचे संकेत मिळत आहे. राबडीदेवी यांनी बिहारवासियांना शुभेच्छा देत मुख्यमंत्री नितीशकुमारांबाबत (Nitish kumar) मोठे राजकीय भाष्य केले आहे. नितीशकुमार यांना पुन्हा एकदा महाआघाडीत सहभागी करून घेण्याबाबत पक्ष विचार करेल, असे राबडीदेवी यांनी स्पष्ट केले आहे. प्रदेशाध्यक्षांसह सर्वच नेते याबाबत चर्चा करतील, असे राबडीदेवी यांनी म्हटले आहे. यामुळे बिहारचे राजकारणाला पुन्हा एकदा कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अरुणाचलमधील फोडाफोडी राजद करणार ‘कॅश’

अरुणाचल प्रदेशातील जदयु आमदारांना फोडून भाजपाने आपल्या गोटात सामील करून घेतल्यामुळे जदयु आणि भाजपातील संबंध ताणले आहे. अद्यापपावेतो याचे पडसाद उघडरित्या जाणवले नसले तरी जदयुमध्ये अंतर्गत असंतोष खदखदत आहे. नेमकी हीच संधी साधण्याचा राजदने प्लॅन आखला आहे. राजद सुप्रीमो लालूप्रसाद यादव यांनी स्वत: नितीशकुमारांना महाआघाडीत सामील करून घेण्यासाठी मोर्चा सांभाळला आहे. भाजपाच्या या राजकीय धक्क्यामुळे नितीशकुमार नाराज आहेच. त्यांची ही नाराजी साधून लालू त्यांना महाआघाडीत आणण्यासाठी सक्रिय झाले आहे.

लालू यादव सक्रिय

राचीच्या राजेंद्र इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेससच्या (रिम्स, राची) पेईंग वॉर्ड पुन्हा एकदा सत्तेच्या समीकरणाचे केंद्र ठरले आहे. कोट्यवधी रुपयांच्या चारा घोटाळ्याप्रकरमी शिक्षा भोगत असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजद सुप्रीमो लालूप्रसाद यादव तुरुंगातूनच सक्रिय झाले आहे. प्रकृती कालावल्यानंतरही लालू बिहारमध्ये वेळोवेळी बदलत असलेल्या राजकीय सारीपाटावर लालूंनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे. लालू पक्षाच्या रणनीतीकारांसोबत सतत संपर्कात आहेत. दिवसातून तीन ते चार वेळा ते पुत्र तेजस्वी यादव यांच्यासोबत चर्चा करून त्यांना आवश्यक ते निर्देश देत आहे.

तेजस्वींना देताहेत निर्देश
अरुणाचल प्रदेशातील आमदार फोडाफाडीनंतर जदयु आणि भाजपात निर्माण झालेले वितुष्ट कॅश करण्यासाठी लालूंनी विशेष योजना आखली आहे. याच रणनीतींतर्गत त्यांनी तेजस्वींना विशेष निर्देशही दिले आहे. यानंतर राजदच्या सेनापतींना दोन वेगवेगळ्या मोर्चावर तैनात करण्यात आले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी जनता परिवारातील संबंधाचा दाखला देत जदयूच्या वरिष्ठ नेत्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला आहे. याचबरोबर, माजी विधानसभा अध्यक्ष उदय नारायण चौधरी आणि श्याम रजकसारख्या नेत्यांवर पक्षाच्या बाजूने वातावरण तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. एकंदरीत, लालूंसह संपूर्ण राजद नेत्यांनी नितीशकुमारांना महाआघाडीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे दिसून येत आहे.

राजदचे सहा आमदार भाजपाच्या संपर्कात

बिहारमध्ये सध्या पक्ष फुटण्याबाबच्या चर्चांना उधाण आले आहे. कधी सत्ताधारी तर कधी विरोधी पक्षांकडून एकमेकांचे आमदार फुटतील, असे दावे केले जात आहे. अशातच, भाजपा खासदार राकेश सिन्हा यांनी केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. खासदार राकेश सिन्हा यांनी राजदचे सहा आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. पत्रकारांशी चर्चा करताना खासदार सिन्हा म्हणाले की, राजदचे सहा आमदार आमच्या संपर्कात आहे. हे सर्व आमदार भाजपात सामील होऊ इच्छितात. त्यांनी फोनद्वारे स्वत: माझ्याशी चर्चा केली आहे. यादरम्यान, त्यांनी तेजस्वी यादव यांच्यावरही निशाणा साधला आहे. सत्तेत परत येण्याचे तेजस्वींचे स्वप्न पूर्ण होणार नाही. जनतेने त्यांना विरोधी पक्षात बसविले आहे, असा टोमणा खासदार राकेश सिन्हा यांनी हाणला आहे.