girl friend and boy friend

प्रियकराने आपली फसवणूक करुन दुसऱ्या मुलीसोबत संसार थाटलाय हे समजल्यानंतर प्रेयसीला खूप राग आला. तिने थेट प्रियकराच्या घरात घुसून नववधूला मारहाण केली.(girl friend attack on boyfriend`s wife) तिचे केस कापले व फेविक्विकने तिचे डोळे चिकटवले. हे बघून सगळे अवाक झाले.

प्रेमात फसवणूक झाल्यावर प्रियकर किंवा प्रेयसी आजकाल कोणत्याही थराला जातात. मात्र बिहारमधल्या एका मुलीने जे केलं, ते पाहून सर्वचजण आश्चर्यचकीत झाले.  प्रियकराने आपली फसवणूक करुन दुसऱ्या मुलीसोबत संसार थाटलाय हे समजल्यानंतर प्रेयसीला खूप राग आला. तिने थेट प्रियकराच्या घरात घुसून नववधूला मारहाण केली.(girl friend attack on boyfriend`s wife) तिचे केस कापले व फेविक्विकने तिचे डोळे चिकटवले. हे बघून सगळे अवाक झाले. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी चौकशी सुरु केली. आरोपी मुलगी आणि लग्न झालेल्या मुलाचे प्रेम प्रकरण सुरु होते. पण त्याने एक डिसेंबर रोजी शेखपुरा जिल्ह्यात दुसऱ्या मुलीबरोबर लग्न केले.

प्रियकराच्या लग्नाबद्दल समजल्यानंतर प्रेयसी जाब विचारण्यासाठी त्याच्या घरी पोहोचली. तिने झोपेत असलेल्या नववधूचे केस कापले व फेविक्विकने तिचे डोळे चिकटवले. त्यानंतर नवरीला मारहाणही केली. हा सर्व गोंधळ सुरु असताना नातेवाईक तिथे पोहोचले व त्यांनी आरोपी मुलीला पकडले. पोलिसांनी आरोपी युवतीला अटक केली आहे. नववधूला रुग्णालयात दाखल केलं आहे. तिची प्रकृती नाजूक असल्याची माहिती आहे.