प्रख्यात बाइक रायडर श्रीनिवासन यांचे रस्ते अपघातात निधन; जागेवरच झाला मृत्यू

श्रीनिवास आपल्या तीन मित्रांसोबत जैसलमेरला जात असताना त्यांच्या बाइकसमोर उंट आला. डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला अशी माहिती भाटी यांनी दिली.

जयपूर : बेंगळुरू येथील प्रख्यात बाइक रायडर किंग रिचर्ड श्रीनिवासन (King Richard Srinivasan) यांचा राजस्थानातील (Rajasthan) जैसलमेर (Jaisalmer) जिल्ह्यात एका रस्ते अपघातात (Road Accident) मृत्यू झाला. पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे.

पोलिसांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार श्रीनिवास यांची लक्झरी मोडर बाइकने एका उंटाला धडक दिली. सानगड पोलीस ठाण्याचे हेड कॉन्सटेबल सोनाराम भाटी यांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात बुधवारी रात्री फतेहगड उपखंड परिसरात झाला. श्रीनिवास आपल्या तीन मित्रांसोबत जैसलमेरला जात असताना त्यांच्या बाइकसमोर उंट आला. डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला अशी माहिती भाटी यांनी दिली. शवविच्छेदन अहवालानंतर बुधवारी त्यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

श्रीनिवासन बेंगळुरुचे नारायण आणि चेन्नईतील के डा विजय व वेणुगोपाल यांच्यासोबत टूरवर होते आणि त्यांना २३ जानेवारीला बेंगळुरुला पोहोचायचं होतं. मिळालेल्या माहितीनुसार श्रीनिवासन यांनी बाइकवर आशिया, युरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियात हजारो किलोमीटरचा प्रदेश दौरा केला होता.