Amazon ने लाँच केली विचित्र बिकीनी; यामुळे माजला हाहाकार, काही वेळातच प्रॉडक्ट हटवण्याची ओढवली नामुष्की

कालच लोकांनी गुगलविरोधात राग व्यक्त केला होता. कारण गुगलने कन्नड भाषेला भारतातील सर्वात वाईट भाषा असल्याचं सांगितलं होतं. लिम्बावलीने याबाबत सांगितलं होतं की, काही दिवसांपूर्वी गुगलने कन्नडचा अपमान केला होता. त्यानंतर ॲमेझॉनने कन्नड, कन्नडच्या ध्वजाचा रंग आणि प्रतिक चिन्हाचा महिलांच्या कपड्यासाठी वापर केला आहे.

    बंगळुरु : E-commerce कंपनी ॲमेझॉनच्या (Amazon) कन्नडी वेबसाइटवर युजर्ससाठी कर्नाटकाच्या ध्वजाचा रंग आणि राज्य चिन्ह असलेली बिकिनी विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. याविरोधात कर्नाटक सरकारकडून टीका केली जात आहे. राज्यातील कन्नड आणि सांस्कृतिक मंत्री अरविंद लिम्बावलीने सांगितलं की, यावर सरकारकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हा कन्नडी नागरिकांच्या स्वाभिमानाचा मुद्दा असल्याचं सांगून मंत्री म्हणाले की, सरकार असं कृत्य सहन करणार नाही. ॲमेझॉनला यासाठी माफी मागण्यास सांगण्यात आलं आहे.

    कालच लोकांनी गुगलविरोधात राग व्यक्त केला होता. कारण गुगलने कन्नड भाषेला भारतातील सर्वात वाईट भाषा असल्याचं सांगितलं होतं. लिम्बावलीने याबाबत सांगितलं होतं की, काही दिवसांपूर्वी गुगलने कन्नडचा अपमान केला होता. त्यानंतर ॲमेझॉनने कन्नड, कन्नडच्या ध्वजाचा रंग आणि प्रतिक चिन्हाचा महिलांच्या कपड्यासाठी वापर केला आहे. मंत्र्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, बहुराष्ट्रीय कंपन्या कन्नडला वारंवार अपमानित करीत आहे, हे बंद करा. हा कन्नडच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे आणि वारंवार होणाऱ्या या घटना आम्ही सहन करणार नाही. मंत्र्यांनी सांगितलं की, त्यांनी कन्नड नागरिकांची माफी मागायला हवी. ॲमेझॉन कन्नडविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. गुगलच्या प्रकरणातही मंत्र्यांनी कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. मात्र कंपनीने माफी मागितल्यानंतर त्यांनी असं केलं नाही.

    हा सरकारचा अपमान असल्याचं सांगत माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी सरकारकडे ॲमेझॉनविरोधात कारवाई करण्याबाबत गांभीर्याने घेण्यास सांगितले. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होण्यापासून रोखायला हवं. ॲमेझॉनने माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

    bikini launched by amazon the product had to be deleted immediately nrvb