व्हायरससारख्या जैविक शस्त्रांचा वापर युद्धासाठी होऊ शकतो : लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी

कोरोना विषाणू महामारीच्या विरोधात जागतिक संघर्ष सुरू असताना अनेक देशांनी त्यांचे सैन्य, आर्थिक आणि राजकीय वर्चस्व वाढविण्याची संधी शोधली आहे. तसेच येणाऱ्या काळात व्हायरससारख्या जैविक शस्त्रांचा वापर युद्धासाठी होऊ शकतो, असा इशारा सैन्य उपप्रमुख लेफ्टनंट जनरल एस के सैनी यांनी दिला.

बांगलादेशच्या नॅशनल डिफेन्स महाविद्यालयाने डिजीटल पद्धतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला संबोधित करताना लेफ्टनंट जनरल सैनी म्हणाले की, विविध देश व्हायरस नियंत्रित करण्यासाठी धडपडत आहेत, परंतु काही देशांनी सैनिकी, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या आपले वर्चस्व वाढवले ​​आहे. ही संधी शोधली जाणे जागतिक समुदायासाठी चांगली नाही. त्यांनी ही टिप्पणी चीनचे नाव न घेता केली आहे. तसेच त्यांनी चीनने दक्षिण चीन समुद्र आणि हिंदी प्रशांत महासागरात सैन्य प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केल्याबद्दलही टीका केली आहे.

पूर्व लद्दाखमधील सीमा वादावरून भारत आणि चीनमध्ये तब्बल सात महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. चीनच्या आक्रमक वर्तनानंतर ही परिस्थिती उद्भवली.
लष्कराच्या निवेदनानुसार सैनी म्हणाले की प्रकल्पांमध्ये सैन्य क्षमता आणि निधी कमी झाल्यामुळे बहुतेक देशांच्या रणनीतिक सुरक्षेवर परिणाम झाला आहे याचे मुख्य कारण म्हणजे अनेक देशांचा आरोग्याच्या सुविधेवर मोठा खर्च झाला आहे.