bird flu

देशात महाराष्ट्रासहीत केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरयाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि उत्तराखंड या १० राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यू विषाणूचा कहर(bird flu spread in 10 states) पसरला आहे.

दिल्ली: देशात महाराष्ट्रासहीत केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरयाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि उत्तराखंड या १० राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यू विषाणूचा कहर(bird flu spread in 10 states) पसरला आहे. याबाबत केंद्र सरकारच्या पशू पालन आणि डेअरी मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे. राज्यांना वारंवार सूचना देण्यात आल्यानंतरही संसर्ग रोखण्याकरिता सतर्कता दाखविण्यात आली नाही, असे विभागीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले. दरम्यान मानवी संसर्गाबाबत अद्याप कुठलेच प्रकरण नसल्याची त्यांनी स्पष्ट केले. जागतिग पशू संघटनेकडून गाईडलाईन्स जारी करण्यात आली आहे. यात बर्ड फ्लूचा मानवी संसर्ग होत नसल्याचे वैज्ञानिकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.

पोल्ट्री बाजार बंद ठेवण्याचा निर्णय
हरयाणा येथील ३ जिल्हे, हिमाचल प्रदेशातील ५ तसेच उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड येथील सर्व जिल्ह्यांतील पोल्ट्री बाजार बंद करण्यात आले आहे. तर दिल्ली येथे बाहेरून कोंबड्या आणि अंडी आणण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. गाजीपूर येथील कोंबडी आणि अंडी बाजार १० दिवसांकरिता बंद करण्यात आला आहे.

लातूरमध्ये पक्ष्यांना ठार करण्याचे आदेश
लातूर जिल्ह्यातील केंद्रवाडी आणि सुकनी गावात बर्ड फ्लूची पुष्टी झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने पक्ष्यांना ठार मारण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिले. एक किमी परिसरातील सर्व पक्षी ठार करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

उत्तराखंडमध्ये हायअलर्ट
उत्तराखंडमध्येही कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याची पुष्टी होताच राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याच्या मंत्री रेखा आर्य यांनी अधिकाऱ्यांसोबत स्थितीचा आढावा घेतला. राज्यातील स्थिती नियंत्रणात असल्याची माहिती त्यांनी दिली.