भाजपच्या महासचिवांचा महिले सोबतचा WhatsApp वरिल सेक्स व्हिडीओ चॅट व्हायरल

"व्हिडीओ अपलोड करणारा यूट्यूबर देखील भाजपचा कार्यकर्ता आहे. त्याने दोन वेळा राघवनवर कारवाई करण्यास सांगितले होते. तो YouTuber मला माझ्या कार्यालयात दोनदा भेटला होता आणि राघवनविरोधात पुरावे असल्याचा दावा केला होता. त्यांनी राघवनवर कारवाई करण्याची मागणी केली होती.” अशी प्रतिक्रिया तामिळनाडूच्या भाजप प्रदेशाध्यक्षांनी दिली आहे.

    तामिळनाडू भाजपचे सरचिटणीस के. टी. राघवन यांचं एका महिले सोबतचे WhatsApp वरिल व्हिडीओ चॅट व्हायरल झाला. त्यामुळे, राघवन यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजिनामा दिला आहे. राघवन यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यामध्ये ते एका महिलेसोबत सेक्स व्हिडिओ चॅट करताना दिसत आहेत. मात्र, राघवन यांनी त्या व्हायरल व्हिडीओतील व्यक्ती आपण नसुन कुणीतरी बदनामी करण्यासाठी हा खोडसाळपणा केल्याचं मत व्यक्त केलं आहे.

    या संदर्भात बोलताना भाजप सरचिटणीस केटी राघवन म्हणाले की, “गेल्या 30 वर्षांपासून मी कोणत्याही नफ्याची अपेक्षा न करता पक्षासाठी काम केलं आणि अजूनही करतो आहे. मला सकाळी सोशल मीडियावर एका व्हायरल व्हिडिओबद्दल माहिती मिळाली. माझी आणि माझ्या पक्षाची बदनामी करण्याच्या उद्देशाने हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. मी प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांची भेट घेतली आणि या विषयासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे, सध्यातरी मी माझ्या पक्षाच्या पदाचा राजीनामा देत आहे. मी कायदेशीर मार्ग स्वीकारेन. सत्याचा विजय होइल!”

    ते म्हणाले की, “तामिळनाडूची जनता आणि जवळच्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. अन्नामलाई यांनी या आरोपांची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले असून लवकरच काय खरं काय खोटं ते समोर येइल.

    प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई म्हणाले की, “पक्षाने राघवन यांचा राजीनामा स्वीकारला आहे. व्हिडीओ अपलोड करणारा यूट्यूबर देखील भाजपचा कार्यकर्ता आहे. त्याने दोन वेळा राघवनवर कारवाई करण्यास सांगितले होते. तो YouTuber मला माझ्या कार्यालयात दोनदा भेटला होता आणि राघवनविरोधात पुरावे असल्याचा दावा केला होता. त्यांनी राघवनवर कारवाई करण्याची मागणी केली होती.”