bjp in bengal

तृणमूल काँग्रेसच्या(trunmul congress) नेतृत्वातील सरकारद्वारे आयोजित ‘आऊटरिच’ कार्यक्रम(outrich program) ‘दुआरे सरकार’ला प्रत्युत्तर म्हणून भाजपानेही(bjp ar noy anyay mission in bengal) ‘आर नोय अन्याय’ (आता पुन्हा अन्याय नाही) या मोहिमेद्वारे घरोघरी मतदारांसोबत थेट संपर्क साधण्याचा कार्यक्रम आखला आहे. या कार्यक्रमानुसार पक्षाचे कार्यकर्ते तब्बल एक कोटी कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.

कोलकाता: पुढील वर्षी होत असलेल्या बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी(election in west) bengal भारतीय जनता पक्षाने आतापासूनच कंबर कसली आहे. तृणमूल काँग्रेसच्या(trunmul congress) नेतृत्वातील सरकारद्वारे आयोजित ‘आऊटरिच’ कार्यक्रम(outreach program) ‘दुआरे सरकार’ला प्रत्युत्तर म्हणून भाजपानेही ‘आर नोय अन्याय’ (आता पुन्हा अन्याय नाही) या मोहिमेद्वारे(ar noy anyay mission of bjp) घरोघरी मतदारांसोबत थेट संपर्क साधण्याचा कार्यक्रम आखला आहे. या कार्यक्रमानुसार पक्षाचे कार्यकर्ते तब्बल एक कोटी कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत भाजपा ममता सरकारच्या कथित भ्रष्टाचाराचाही खुलासा करणार आहे.

एक कोटी कुटुंबीयांची घेणार भेट

ममता बॅनर्जी सरकारद्वारे सुरू असलेल्या दुआरे सरकार कार्यक्रमाच्या धर्तीवर भाजपा कार्यकर्तेही ५ डिसेंबर रोजी एक कोटीपेक्षा अधिक कुटुंबीयांपर्यंत पोहोचणार आहेत. या अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या मोहिमेला ‘आर नोय अन्याय’ (आता पुन्हा अन्याय नाही) असे नाव देण्यात आले आहे, अशी माहिती बंगाल भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी दिली. यासोबतच राज्यभरातील भाजपा कार्यकर्ते तृणमूल सरकारच्या भ्रष्टाचाराचीही माहिती जनतेला देणार आहेत व पत्रकेही वाटणार आहेत. या माध्यमातून केंद्राच्या योजना जसे शेतकरी सन्मान योजना आणि आयुष्मान रोजगार योजनेपासून जनतेला कसे वंचित करण्यात आले याचाही प्रचार केला जाणार आहे.

ममतांचा आऊटरिच कार्यक्रम

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी ममता बॅनर्जींनी पुढील दोन महिन्यात जनतेसोबत संपर्क साधण्यासाठी सर्वात मोठा आऊटरिच कार्यक्रम आखला आहे. एक डिसेंबरपासून २८ जानेवारीपर्यंत राज्यातील ३४४ ब्लॉकमधील प्रत्येक गाव आणि नगर पालिका क्षेत्रात कमीत कमी चार शिबिरे आयोजित केली डजाणार असून या शिबिरात मनेरगा जॉब कार्ड, आरोग्य कार्ड, जात प्रमाणपत्र आणि राशनकार्डसह विविध सरकारी सुविधांचा उपयोग करण्यास मदत केली जाणार आहे.

आक्रमक प्रचाराचा दुसरा टप्पा
दुसरीकडे, भाजपा नेत्यांनी ‘ओर नोय अन्याय’ मोहिमेचा हा दुसरा टप्पा असल्याचे म्हटले. पहिला टप्प्या याच वर्षी प्रारंभ करण्यात आला होता. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री बंगालमध्ये आले होते. दरम्यान भाजपा नेत्यांनी या मोहिमेसाठी बैठका सुरू केल्या असून डिसेंबर रोजी भाजपा कार्यकर्ते एकाचवेळी दुपारी १२ वाजता एक कोटी कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.

मुस्लीम मतांचे विभाजन रोखण्याचा ममतांचा प्रयत्न

बिहार निवडणुकीत पाच जागा प्राप्त करणाऱ्या असदुद्दीन ओवेसींच्या एआयएमआयएम या पक्षाची नजर आता बंगालच्या मुस्लीम मतांवर आहे. पुढील वर्षी होणाही निवडणूक लढविण्याची घोषणाही ओवेसींनी केली आहे. त्यानंतर आता सत्तारूढ तृणमूल काँग्रेसला मुस्लिमांचे मत विभाजन होण्याची भीती वाटू लागली आहे. तथापि हे विभाजन रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी रणनीती आखण्यास सुरुवात केली असून त्यांनी फुरफुरा शरीफ येथील पीरजादा तोहा सिद्दीकांसोबत चर्चा केली. यासोबतच ममता अन्य धर्मगुरुंच्याही संपर्कात असल्याचे समजते. हुगळी जिल्ह्यातील फुरफुरा शरीफ मुस्लिमांचे प्रमुख धार्मिक केंद्र आहे.

‘गुप्त युती’ची रणनीती
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मुस्लिम मतांचे विभाजन रोखण्यासाठी ममता तोहा सिद्दीकी व अन्य मुस्लिम धर्मगुरुंच्या मदतीने एका नव्या पक्षाची स्थापना करून निवडणूक रिंगणात दाखल करण्याची शक्यता आहे. जर एखादा मतदार तृणमूलवर नाराज असेल तर त्याने पक्षाला पाठिंबा द्यावा हा त्यांचा यामागील उद्देश आहे. याचाच अर्थ गुप्त युतीच्या माध्यातून संपूर्ण मुस्लिम व्होट बँक त्यांच्याकडेच राहावी अशी ही रणनीती आहे. कोणत्याही स्थितीत ओवेसी वा भाजपाला त्या मुस्लीम मतांचा फायदा पोहोचू देण्यास तयार नाहीत.