भाजप, जेडीयू आणि लोकजनशक्ती पार्टी एकत्र निवडणूक लढणार

भाजपा, जेडीयू आणि लोकजनशक्ती पार्टी जेव्हा जेव्हा एकत्र आले तेव्हा आपलाच विजय झाला आहे. आपण तिन्ही पक्ष मिळून ही निवडणूक लढवणार व विजयी होणार आहोत. असे जेपी नड्डा यांनी सांगतिले. बिहार व देशात विरोधी पक्ष पूर्णपणे संपुष्टात आला असून, विरोधी पक्ष केवळ पोकळ राजकारण करतो.

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीला लवकरच सुरूवात होणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. भाजपा प्रदेश कार्य समितीची व्हर्च्युअल बैठक पार पडली. या बैठकीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आगामी बिहार विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात भाजप, जेडीयू आणि लोकजनशक्ती पार्टी एकत्र लढवणार असल्याची घोषणा केली आहे.

भाजपा, जेडीयू आणि लोकजनशक्ती पार्टी जेव्हा जेव्हा एकत्र आले तेव्हा आपलाच विजय झाला आहे. आपण तिन्ही पक्ष मिळून ही निवडणूक लढवणार व विजयी होणार आहोत. असे जेपी नड्डा यांनी सांगतिले. बिहार व देशात विरोधी पक्ष पूर्णपणे संपुष्टात आला असून, विरोधी पक्ष केवळ पोकळ राजकारण करतो. तसेच जे.पी नड्डा यांनी कार्यकर्त्यांना छोट्या सभा घेण्याची व डोर-टू-डोर प्रचार करण्याची विनंती केली. सर्वात प्रभावी मोहीम घराघरात जाईल. भाजप आणि नितीशकुमार यांच्यामार्फत करण्यात आलेली कामे बिहारमधील जनतेपर्यंत पोहोचवावी लागतील. अशी टीका जे.पी. नड्डा यांनी विरोधकांवर केली आहे.


जे.पी नड्डा पुढे म्हणाले की, आपल्याकडे साथीचे रोग, पूर आणि निवडणुका यांचे आव्हान आहे. संपूर्ण देशात दहा लाखावर कोरोना संक्रमितांची संख्या गेली आहे. रिकव्हरी रेट देशात ७४ टक्के आहे. त्याचवेळी बिहारमधील रिक्व्हरी रेट ७३ टक्क्यांहून अधिक आहे. यासाठी आरोग्यमंत्री मंगल पांडे अभिनंदनास पात्र आहेत.