gaurav bhatia

काँग्रेस पक्ष हा टायटॅनिकच्या जहाजासारखा(Congress Party Is Like Titanic Ship) असल्याचं गौरव भाटिया यांनी म्हटलं आहे. त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी(Soniya Gandhi) आणि राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्यावरही टीका केली आहे.

    एका वाहिनीच्या लाईव्ह चर्चेदरम्यान भाजपा नेते आणि प्रवक्ते गौरव भाटिया (Gourav Bhatia) यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेस पक्ष हा टायटॅनिकच्या जहाजासारखा(Congress Party Is Like Titanic Ship) असल्याचं गौरव भाटिया यांनी म्हटलं आहे. त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावरही टीका केली आहे.

    निवेदकाने त्यांना विचारलं की आता तुमच्याकडेही एक ताजं उदाहरण आहे. मुकूल रॉय जे आजपर्यंत तुमच्यासोबत होते ते आता पुन्हा ममता बॅनर्जींच्या बाजूला गेले आहे. त्याबद्दल काय वाटतं? तेव्हा ते म्हणाले, एखाद्या पक्षाची ओळख म्हणजे त्याची विचारधारा आणि नेतृत्व असतं. भारतीय जनता पार्टीची विचारधारा स्पष्ट आहे आणि आमचं नेतृत्व म्हणजे मोदीजी देशातच नव्हे तर जगभरातलं सर्वात खंबीर नेतृत्व आहे.

    ते पुढे म्हणाले, दुसऱ्या बाजूला बघितलं तर काँग्रेस पक्ष हा टायटॅनिकच्या जहाजासारखा आहे. तो बुडतच चालला आहे. बुडणार तर आहेच तो कारण राहुल गांधींच्या परिवाराव्यतिरिक्त जर कोणी उठून दिसू लागला तर त्याला दाबून टाकलं जातं, त्याला बाजूला केलं जातं. म्हणून पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंह विरुद्ध नवज्योत सिंह सिद्धू, राजस्थानात अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट आणि समाजवादी पार्टी तर एकाच परिवारातल्या सदस्यांनी तयार झालेली आहे. अध्यक्षही त्याच परिवारातला आहे.

    गौरव भाटिया म्हणाले, मुकुल रॉय यांच्याबद्दल मी म्हणेन की इथेही फरक आपल्याला दिसून येतो. जितिन प्रसाद काँग्रेस सोडून जातात तेव्हा मध्यप्रदेशातली काँग्रेसची शाखा म्हणते की, तो कचरा होता, कचरापेटीत गेला. पण जेव्हा मुकुल रॉय सोडून गेले, तेव्हा आम्ही अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य केलं नाही.