सुशांतच्या मृत्यूचा भाजपाने ट्रम्प कार्डसारखा केला वापर – खासदार चौधरी

भाजपाकडून(bjp) सुशांतच्या मृत्यूचा(sushant death) राजकीय ट्रम्प कार्डसारखा(political trump card) वापर होत आहे, असा आरोप काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी(adhir ranjan choudhary) यांनी केला आहे. तसेच बिहार निवडणूक लक्षात घेऊन हे राजकारण केले जात असल्याचेही अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले आहे.

चौधरी यांनी पुढे म्हटले आहे की, रियाला वेगळ्या गुन्ह्यासाठी अटक करण्यात आली आहे. तिच्याविरोधात हत्येचे पुरावे नाहीत. बिहारवासीयांना फक्त भाजपच न्याय देऊ शकते, असे दाखविण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरु आहे.

या अगोदरही भाजपा बिहार निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुशांत प्रकरणावर राजकारण करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. आता काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी याच आरोपाचा पुनरुच्चार केला आहे.