bjp

भाजपा प्रदेशाध्यक्षांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेले पत्र म्हणजे खोडसाळपणा असल्याचे सांगत पत्रातील सत्यता फेटाळून लावली आहे.

नवराष्ट्र न्यूज नेटवर्क

जयपूर. राजस्थानमध्ये भाजपातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली असताना नवा वाद निर्माण झाला. वसुंधरा यांच्या गटाचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पत्रानंतर आता सतिश पुनिया गटाचे पत्राने खळबळ उडाली आहे. या पत्रामध्ये जुगल शर्मा यांना मोर्चा प्रदेशाध्यक्ष दाखविण्यात आले असून प्रदेश प्रभारी, सचिव, मीडिया प्रभारी आणि उपाध्यक्ष पदाची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले. नियुक्ती पत्रामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष पुनिया यांचा फोटो आहे.

-पत्रातील सत्यता फेटाळली

भाजपा प्रदेशाध्यक्ष सतिश पुनीया यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेले पत्र म्हणजे खोडसाळपणा असल्याचे सांगत पत्रातील सत्यता फेटाळून लावली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वकीलांकडून सल्ला घेण्यात येत असल्याची माहिती दिली. तर दुसरीकडे भाजपामध्ये निर्माण झालेल्या या वादानंतर काँग्रेसने टीका केली आहे.

-काय आहे प्रकरण

यापूर्वी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या समर्थकांचे पत्र व्हायरल झाले होते. यात जिल्हानिहाय कार्यकारणी घोषीत करण्यात आली होती. तसेच 2023 मध्ये वसुंधरा यांना मुख्यमंत्री बनविण्याचे प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले होते. आता त्याच प्रकारचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यात प्रदेशाध्यक्ष सतिश पुनीया यांना 2023 मध्ये मुख्यमंत्री बनविण्याचे उद्दीष्ट असून विविध नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.