आता ब्लॅक फंगस रडवणार : १५ राज्यांमध्ये आतापर्यंत ९३२० प्रकरणांची नोंद, सर्वाधिक ५००० प्रकरणे गुजरातमध्ये, ११ राज्यांमध्ये महामारी घोषित

ब्लॅग फंगस हरयाणाने सर्वप्रथम महामारी म्हणून घोषित केली. त्यानंतर राजस्थाननेही या संक्रमणाला महामारी कायद्यात समाविष्ट केलं. त्यानंतर केंद्र सरकारनेही सर्व राज्यांना सांगितलं की ब्लॅक फंगसला पॅनडेमिक कायद्यांतर्गत साथरोग कायद्यांतर्गत मान्यता द्यावी.

    कोरोना महामारी दरम्यान म्युकर मायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगस धिंगाणा घालू लागला आहे. गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश सह १५ राज्यांत आतापर्यंत ब्लॅक फंगसची ९३२० प्रकरणे समोर आली आहेत. तर २३५ जण दगावले आहेत. सर्वाधिक ५००० प्रकरणे एकट्या गुजरातमधून समोर आली आहेत. या संक्रमणामुळे काही रुग्णांवर डोळे काढण्याचीही वेळ आली आहे.

    आतापर्यंत ११ राज्यांत ब्लॅक फंगस महामारी घोषित

    ब्लॅग फंगस हरयाणाने सर्वप्रथम महामारी म्हणून घोषित केली. त्यानंतर राजस्थाननेही या संक्रमणाला महामारी कायद्यात समाविष्ट केलं. त्यानंतर केंद्र सरकारनेही सर्व राज्यांना सांगितलं की ब्लॅक फंगसला पॅनडेमिक कायद्यांतर्गत साथरोग कायद्यांतर्गत मान्यता द्यावी. यानंतर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, चंदीगड, हिमाचल प्रदेश, ओडिशा, कर्नाटक, तेलंगणा आणि तमिळनाडू या राज्यांनीही ब्लॅक फंगस संक्रमणाला महामारी म्हणून घोषित केलं आहे.

    वर दिलेल्या आलेखाच्या जाणून घेऊयात कोणत्या राज्यांमध्ये काय स्थिती आहे.

    black fungus infection latest update mucormycosis patients found in country statewise data know full story in details