blood bank for dogs

लुधियाना. येथील गुरू अंगद देव पशुवैद्यकीय व प्राणी विज्ञान विद्यापीठात श्वानांसाठी विशेष रक्तपेढी (blood bank for dogs) स्थापन करण्यात आली आहे. उत्तर भारतात श्वानांसाठी ही पहिली रक्तपेढी आहे. रक्‍त, प्लेटलेट्स, प्लाझ्मा विविध रोगांनी ग्रस्त असलेल्या किंवा अपघातात जखमी झालेल्या श्रानांवर येथे उपचार करण्यात येतात. एवढेच नव्हे तर रक्‍तदात्या श्रानांद्वारेही रक्‍त वाढविले जाते. विद्यापीठाच्या छोट्या प्राण्यांच्या मल्टी-स्पेशॅलिटी पशुवैद्यकीय रुग्णालयात या रक्तपेढीमध्ये आतापर्यंत १२० हून अधिक आजारी श्रानांना रक्‍त देण्यात आले आहे.

भारतात फक्त दोनच प्रकल्प 

काही महिन्यांत मोठ्या प्राण्यांसाठी रक्‍तपेढी तयार करण्याची योजना आहे. रक्‍त विभाग स्थापन करण्यासाठी ५० लाख रुपये खर्च झाल्याचे मेडिसीन विभागाचे असोसिएट प्रोफेसर आणि रक्‍तपेढीचे प्रभारी डॉ. सुरती शर्मा यांनी. त्या सांगतात की, आतापर्यंत भारत सरकारच्या जैव तंत्रज्ञान विभागाने श्‍वान रक्‍तपेढीचे फक्त दोन प्रकल्प सुरू केले आहेत.

अत्याधुनिक उपकरणे

त्या म्हणाल्या की, अशा प्रकारची पहिली रक्तपेढी चेन्नई पशुवैद्यकीय विद्यापीठात तर दुसरी लुधियानामध्ये आहे. येथे अत्याधुनिक मशीन्स आहेत. कॅरिओफ्यूज मशीन कुत्राकडून प्राप्त झालेल्या रक्‍्तापासून आरबीसी (लाल रक्तपेशी), प्लाइमा आणि प्लेटलेट वेगळे करते. प्लाझ्मा एक्सप्रेसर मशीन आरबीसीपासून प्लाझ्मा विभक्त करण्यास मदत करते.

म्हणून गरज निर्माण झाली

डॉ शर्मा म्हणतात की, दरवर्षी सुमारे २५ ते ३० हजार आजारी पाळीव श्वान विद्यापीठाच्या रुग्णालयात उपचारासाठी येतात. यातील सुमारे ५०० श्वान अशक्तपणाचा बळी आहेत. बर्‍याच श्वानांमध्ये प्लेटलेटची कमतरता असते. सामान्यतः निरोगी श्रानांमध्ये रक्‍ताचे प्रमाण (हिमोग्लोबिन) १२ ते १५ ग्रॅम आणि प्लेटलेटचे प्रमाण अडीच ते पाच ‘लाखांदरम्यान असते. पूर्वी फक्त औषधानेच उपचार केले जात होते. त्यामुळे आजारी श्वानांचा रक्ताच्या अभावी मृत्यू व्हायचा. आता तसे नाही.

रक्‍ताचे १३ प्रकार

डॉ. शर्मा म्हणतात की, रक्‍त देण्यापूर्वी आपण रक्तदाता श्वान आणि आजारी श्वानाच्या रक्ताचे क्रॉस मॅचिंग करतो. श्वानांमध्ये १३ प्रकारचे रक्‍त गट असतात, त्यापैकी ६५ टक्के श्वानांचा रक्‍त गट डीईए १.१ असतो. जेव्हा श्रानांच्या शरीरामध्ये पाच ग्रॅमपेक्षा कमी हिमोग्लोबिन असतो किंवा प्लेटलेट्स ५० हजारांपेक्षा कमी असतात तेव्हा रक्‍त देणे आवश्यक असते. श्रानांचा प्लेटलेट सहा दिवस, आरबीसी २८ ते ३० दिवस आणि प्लाझ्मा एक ते दोन वर्ष संरक्षित केळे जाऊ शकतात.