boat sink in chambal river kota rajasthan

कोटा. कोटा जिल्ह्याच्या झटावा जवळ चंबल नदीमध्ये (chambal river) नाव पलटून (boat sink) ७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यात ८ जण अद्यापही बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. क्षमतेपेक्षा जास्त लोकं आणि सामान भरल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार नावामध्ये एकूण ३० जण प्रवास करीत होते. याशिवाय नावेत १४ मोटारसायकल सुद्धा नेण्यात येत होते असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नाव पलटल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी तात्काळ बचावकार्य सुरु केले, परंतु प्रवाह अधिक असल्याने अनेक जण वाहून गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे लोक कळमेश्वर धाम येथे जात होते. मृत पावलेले अधिकांश जण हे गोठला येथील रहिवासी आहेत. ही घटना आज सकाळी ९ वाजता चानदा आणि गोठडा या गावादरम्यान घडली. सुदैवाने घटनास्थळी बरेच लोकं उपस्थित असल्याने तात्काळ मदत मिळाली आणि अनेकांचे प्राण वाचविण्यात यश आले.

प्रत्यक्षदर्शींच्या मते  लाकडी बोटीची अवस्था आधीच खराब होती. यानंतरही क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसले होते. तसेच नदी पार करण्यासाठी बोटीबरोबर बाईकसुद्धा बांधल्या गेल्या. यामुळे बोट आपले वजन सहन करू शकली नाही आणि बुडली. घटनेची माहिती मिळताच कोटाचे खासदार आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रशासनाकडून माहिती घेतली. लोकसभा सचिवालय जिल्हा प्रशासनाशी संपर्कात असून कोटा येथील एसडीआरएफची टीम घटनास्थळी पाठविली आहे. याशिवाय लोकसभा सभापतींचे कार्यालय जिल्हा प्रशासनाशी सतत संपर्कात आहे.