लसीचे दोन्ही डोस घेतल्यास मृत्यूचा धोका ९५ टक्क्यांपर्यंत कमी

तमिळनाडूच्या पोलीस दलातल्या एक लाख १७ हजार ५२४ जवानांच्या आधारे हा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासादरम्यान लस घेतलेले जवान आणि लस न घेतलेले जवान यांच्यापैकी किती जणांचा कोरोनाने मृत्यू झाला याबद्दल निरीक्षण करण्यात आलं.

    देशात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने चांगलाच वेग घेतला आहे. अशातच या लसींच्या परिणामकारकतेसंदर्भात एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. भारतीय संशोधन अनुसंधान संस्था अर्थात आयसीएमआऱच्या एका अभ्यासातून हे समोर आलं आहे की, जर कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर मृत्यूचा धोका ९५ टक्क्यांपर्यत कमी होतो.