‘.. यापुढे ब्राह्मण समाज भाजपला मतदान करणार नाही’, ‘या’ राजकीय नेत्याने केले मोठे वक्तव्य

बसपाचे सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली २३ जुलैपासून ब्राह्मण समाजाला जागरूक करण्यासाठी अयोध्येतून विशेष मोहीम सुरू केली जाणार असल्याचे मायावती यांनी स्पष्ट केले आहे.

    आगामी काळात उत्तर प्रदेश होणाऱ्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी राजकीय मोर्चेबांधणी सुरुवात केली आहे. विविध राजकीय घडामोडीना वेगा आला आहे. अशातच बहुजन समाजपार्टीच्या अध्यक्षा मायामवती यांनी मोठे वक्तव्य करत भाजपावर टीका केली आहे.

    ‘येत्या २०२२ च्या उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत येथील ब्राह्मण समाज भाजपला मतदान करणार नाही, भाजपकडून ब्राह्मण समाजाची दिशाभूल केली जात असली तरी ते त्याला बळी पडणार नाहीत’ असे मायावती म्हणाल्या आहेत.

    ब्राह्मण समाजाला बसपासोबत जोडण्यासाठी पुढील आठवडय़ात अयोध्येतून विशेष मोहीम सुरू केली जाणार आहे. त्याचाच भाग म्हणून बसपाचे सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली २३ जुलैपासून ब्राह्मण समाजाला जागरूक करण्यासाठी अयोध्येतून विशेष मोहीम सुरू केली जाणार असल्याचे मायावती यांनी स्पष्ट केले आहे.

    आजपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बसपा महागाई, इंधन दरवाढ, घरगुती गॅसच्या वाढलेल्या किमती आणि कोरोना लसीकरण मोहीम याबाबत आवाज उठवणार असल्याचेही मायावती म्हणाल्या आहेत.