फिटनेसवालं लग्न! जेव्हा वर-वधू वेडिंग स्टेजवरच पुशअप्स काढू लागतात तेव्हा…

हा व्हिडिओ अक्षिताने स्वत: इंस्टाग्रामवर शेअर केला,प्रतिक्रिया सेक्शनमध्ये लोकं कपलच्या फिटनेस प्रेमाचं कौतुक करत आहेत. असं क्वचितच पाहायला मिळतं जेव्हा एखादं कपल लग्नाच्या पोशाखात पुशअप्स काढत आहेत.

  कपल्सने सोबतच काढल्या पुशअप्स


  क्वचितच आपण वर-वधूला नटून-थटून वेडिंग स्टेजवर पुशअप्स करताना पाहिलं असेल. हेच कारण आहे की, या फिटनेसप्रेमी कपलचा व्हिडिओ इंटरनेटवर खूप पाहिला जातो आहे. जर आपणही बॉडिबिल्डिंगचे शौकिन असाल तर आपलंही लग्न असंच अविस्मरणीय व्हावं असं वाटत असेल तर याहून उत्तम मार्ग कोणता असू शकतो. नाही का?

  काय आहे प्रकरण

  हा व्हिडिओ अक्षिता आणि आदित्य नावाच्या कपल्सचा आहे, जो वेडिंग स्टेजवर पुश-अप्स काढताना दिसत आहे. दोघेही फिटनेस कोच आहेत. अलीकडेच वधूने जेव्हा लग्नाचा हा अविस्मरणीय क्षण इंस्टाग्रामवर शेअर केला होता, जो अनेकांना फिट राहण्यासाठी प्रोत्साहन देताना दिसतो आहे.

  हा पाहा व्हिडिओ :

  हा व्हिडिओ अक्षिताने स्वत: इंस्टाग्रामवर शेअर केला,प्रतिक्रिया सेक्शनमध्ये लोकं कपलच्या फिटनेस प्रेमाचं कौतुक करत आहेत. असं क्वचितच पाहायला मिळतं जेव्हा एखादं कपल लग्नाच्या पोशाखात पुशअप्स काढत आहेत.

  व्हिडिओत आहे काय?

  व्हायरल क्लिपमध्ये पाहू शकता की, कपल, वर-वधूच्या पोशाखात वेडिंग स्टेजवर पुशअप्स काढत आहेत. येथे वधूनेही लेहंगा आणि दागिन्यांमध्ये दिसत आहे, तर वरानेही हल्क्या गुलाबी रंगाची शेरवानी घातलेली आहे. असे कपडे घालून वधूने १० पुशअप्स काढले. व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला व्हायरल गाणं ‘बचपन का प्यार’ सुरू आहे.