VIDEO: अरेच्चा! आता तर सुरू झालीये नवी प्रथा; पाहून तुम्हालाही हसू आवरल्याशिवाय राहणार नाही, जाणून घ्या कारण

सासरी पोहोचताच नवरदेवाचं मोठ्या थाटात स्वागत केलं जातं. मात्र, अनेकदा याचवेळी असं काही घडतं की पाहणारे लोकंही विचारात पडतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिसतं, की नवरदेव आपल्या सासरी पोहोचतो मात्र यानंतर नवरी नवरदेवावर (Bride and Groom Video) तांदूळ फेकून त्याचं स्वागत करते.

    नवी दिल्ली : सोशल मीडियावर (Social Media) लग्नसमारंभातील व्हिडिओ (Wedding Video) मागील काही दिवसांपासून चांगलेच व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतं. हे व्हिडिओ नेटकऱ्यांच्याही पसंतीस उतरतात. यातील काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात की, ते आपला दिवसच चांगला बनवतात. सध्या असाच एक व्हि़डिओ चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

    आपल्या सर्वांना माहिती आहे की सासरी पोहोचताच नवरदेवाचं मोठ्या थाटात स्वागत केलं जातं. मात्र, अनेकदा याचवेळी असं काही घडतं की पाहणारे लोकंही विचारात पडतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिसतं, की नवरदेव आपल्या सासरी पोहोचतो मात्र यानंतर नवरी नवरदेवावर (Bride and Groom Video) तांदूळ फेकून त्याचं स्वागत करते. नवरीची उंची कमी असल्यानं तिच्या वडिलांनी तिला उचलून घेतलं आहे. तर, नवरदेवही आपल्या होणाऱ्या पत्नीच्या अंगावर तांदूळ फेकत आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Adarsh+sejal ❤️ (@mr_mrs._jain)

    हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडिओला नेटकऱ्यांची पसंतीही मिळत आहे. याच कारणामुळे अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करत म्हटलं, की लग्नातील अशी प्रथा मी पहिल्यांदाच पाहिली. तर आणखी एकानं कमेंट करत म्हटलं, की हे लग्न आहे की युद्ध. बातमी देईपर्यंत १५ हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. आदर्श सेजल नावाच्या युजरनं हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

    bride and groom of funny wedding video goes viral on social media