सीमेवर बीएसएफला सापडले गुप्त भुयार, पाकने रचला डाव

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मूच्या सांबा (Samba) सेक्टरमध्ये बीएसएफच्या जवानांना हे सुरंग आढळले. या भुयाराजवळ वाळूच्या पिशव्या देखील आढळल्या आहेत, ज्यावर पाकिस्तानचा उल्लेख आहे. हे भुयार जवळपास २० मीटर लांबीचे आहे. पावसामुळे जमीन धसल्याने जवानांना भुयाराची शंका आली. यानंतर त्वरित पाहणी करण्यासाठी मशीन मागवण्यात आली.

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu & Kashmir) भारत आणि पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफच्या (Border Security Force) जवानांना मोठे भुयार (Tunnel ) सापडल्याची माहिती काल शनिवारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. या भुयाराची पाहणी केली जात असून, दहशतवादी घुसखोरी, अंमली आणि मादक पदार्थ, शस्त्रांची तस्करी करत असण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मूच्या सांबा (Samba) सेक्टरमध्ये बीएसएफच्या जवानांना हे सुरंग आढळले. या भुयाराजवळ वाळूच्या पिशव्या देखील आढळल्या आहेत, ज्यावर पाकिस्तानचा उल्लेख आहे. हे भुयार जवळपास २० मीटर लांबीचे आहे. पावसामुळे जमीन धसल्याने जवानांना भुयाराची शंका आली. यानंतर त्वरित पाहणी करण्यासाठी मशीन मागवण्यात आली.

 भुयारात सापडलेल्या वाळूच्या प्लास्टिकच्या पिशव्यांवर कराची आणि शकरगढ असे लिहिले आहे. या पिशव्या बनविल्याची आणि एक्सपायरीची तारीख सुद्धा आहे. त्यामुळे या पिशव्या नुकत्याच तयार करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच बीएसएफने अशा अनेक गुप्त मार्गांचा शोध घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमेवर मोठे अभियान चालवले आहे.