kid happy to see wine glass

उद्योगपती आनंद महिंद्रा(Anand Mahindra) यांनी लहान मुलाचा एक व्हिडिओ (Kid Viral Video)सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, कधीकधी एक व्हिडिओ तुमचा मूड पूर्ण बदलून टाकतो.

    सोशल मीडियावर मुलांचे अनेक व्हिडिओ व्हायरल(Viral Video) झाले आहेत. सध्या इंटरनेटवर एक व्हिडिओ लोकांच्या खूप पसंतीस पडत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगा दूधाचा नव्हे तर वाईनचा ग्लास बघितल्यावर खूप आनंदी(boy happy to See Wine Glass) होत असल्याचे दिसत आहे. हा क्यूट व्हिडिओ(Cute Video on Internet) पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. तुम्ही पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ बघाल.


    उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी लहान मुलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, कधीकधी एक व्हिडिओ तुमचा मूड पूर्ण बदलून टाकतो.


    व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, नुडल्स किंवा दूध घ्यायला हा मुलगा नकार देत आहे.मात्र वाईनचा ग्लास समोर आल्यावर तो मुलगा जोरात हसत आहे. वाईन बघून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

    या व्हिडिओला आत्तापर्यंत १ लाख ७९ हजार पेक्षा जास्त लोकांनी बघितलं आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.