स्वातंत्र्यानंतर वि. दा. सावरकरांना बदनाम करण्याची मोहीम सुरु आहे, पुढील नंबर विवेकानंदांचा, सरसंघचालक मोहन भागवतांचा विरोधकांवर हल्लाबोल

स्वातंत्र्यानंतर जाणीवपूर्वक सावरकारांच्या बदनामीची मोहीम राबवण्यात आली, त्यानंतर आता स्वामी विवेकानंद (swami vivekananda), स्वामी दयानंद सरस्वती (swami dayanand saraswati) आणि योगी अरविंद (yogi arvind) यांच्या बदनामीचे प्रयत्न होतील, असेही ते म्हणाले. सावरकारांवर या तिघांचा प्रभाव होता, त्यामुळे त्यांच्या बदनामीचे प्रयत्न होतील, असे भागवत म्हणाले.

    नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर (V D Savarkar) यांच्यावर टीका करणाऱ्या, काँग्रेससहित सर्वच विरोधकांवर (On all the opposition including Congress) सरसंघचालक मोहन भागवत (Sarsanghchalak Mohan Bhagwat) यांनी टीका केली आहे. यावेळी त्यांनी कोणत्याही पक्षाचे नाव घेतले नसले, तरी त्यांचा रोख स्पष्ट आहे. स्वातंत्र्यवीर सावरकारांबाबत आजही देशाला पुरेशी माहिती नाही, त्याचबरोबर सावरकारांच्या बदनामीची मोहीम सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

    स्वातंत्र्यानंतर जाणीवपूर्वक सावरकारांच्या बदनामीची मोहीम राबवण्यात आली, त्यानंतर आता स्वामी विवेकानंद (swami vivekananda), स्वामी दयानंद सरस्वती (swami dayanand saraswati) आणि योगी अरविंद (yogi arvind) यांच्या बदनामीचे प्रयत्न होतील, असेही ते म्हणाले. सावरकारांवर या तिघांचा प्रभाव होता, त्यामुळे त्यांच्या बदनामीचे प्रयत्न होतील, असे भागवत म्हणाले.

    तर फाळणी झाली नसती

    सरसंघचालक म्हणाले की, भारतीय भाषेच्या परंपरेत, धर्माचा अर्थ जोडणे असा आहे, विस्कटू नये या अर्थी आहे. साधारण शब्दांत भारतीय धर्म म्हणजेच मानवता आहे. जो भारताचा आहे, त्याची सुरक्षा आणि प्रतिष्ठा भारताशी जोडली गेलेली आहे. फाळणीनंतर भारतातून पाकिस्तानात गेलेल्या मुस्लिमांची प्रतिष्ठा त्या देशाने ठेवली नाही. जो भारताचा आहे, तो भारताचाच आहे. आता इतक्या वर्षांनंतर, जेव्हा परिस्थिती पाहतो, तेव्हा लक्षात येतं की हे जोरात बोलण्याची गरज तेव्हा होती. सगळेजण बोलले असते, तर कदाचित फाळणी झाली नसती.

    भागवत म्हणाले की, सय्यद अहमद यांना मुस्लीम असंतोषाचे जनक म्हणून संबोधले जाते. इतिहासात दारा शिकोह झाले, अकबर झाले पण औरंगजेबही झाले. ज्यांनी चाक विरुद्ध दिशेला फिरवलं. अशफाक उल्लाह खानसारख्यांचे नाव गर्जत राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले. मेल्यानंतर पुढचा जन्म पुन्हा भारतातच घेईल, असे अशफाक उल्लाह खान म्हणाले होते, याची आठवण त्यांनी करुन दिली. दिल्लीत सावरकारांवर लिहिलेल्या एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.