supreme court

बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणाचा निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने लखनऊच्या सीबीआय कोर्टाला ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत वाढवून दिली आहे. अयोध्येत ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली होती. निकालासह सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२० पर्यंत मुदत वाढवून देत आहोत. सुरेंद्रकुमार यादव यांचा अहवाल वाचला असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

याआधी सीबीआय न्यायालयाला या प्रकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या प्रकरणात ३२ आरोपी असून लालकृष्ण आडवाणी, कल्याण सिंह, मुरली मनोहर जोशी, उमा भरती, विनय कटियार आणि साध्वी ऋतंभरा यांच्या नावांचा यात समावेश आहे.

दरम्यान, आडवाणी यांनी गेल्या महिन्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टासमोर हजर राहून आपल्यावरील सगळे आरोप खोटे असल्याचे सांगितले. तसेच  या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने आडवाणींना गोवण्यात आल्याचे आणि त्यांच्या विरोधातील सर्व पुरावे चुकीचे असल्याचे आडवाणींचे वकील के. के. मिश्रा यांनी सांगितले.